भारत विरुद्ध कतार : भारताचा फुटबॉल संघाचा माझी कर्णधार सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतर भारताचा संघ पहिल्यांदाच कतारचा सामना करणार आहे. FIFA विश्वचषक 2026 पात्रता फेरीमधील भारत आणि कुवेत यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये कोणत्याही संघाचा एकही गोल न झाल्यामुळे सामना अनिर्णित राहिला. सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतर संघाचे कर्णधारपद गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूकडे सोपवण्यात आले आहे. क्वालिफायरच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटच्या सामन्यात आज भारताचा सामना कतारशी होणार आहे.
[read_also content=”पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताकडून रोहन बोपण्णा आणि सुमित नागल खेळणार https://www.navarashtra.com/sports/rohan-bopanna-and-sumit-nagal-will-play-for-india-in-paris-olympics-2024-546323.html”]
भारतीय संघाचा नवा कर्णधार गुरप्रीत सिंग संधूने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून भारताकडून पाठिंबा मागितला आहे कारण हा सामना जिंकून भारताची पुढील टप्प्यासाठी पात्रता मिळवण्याची शक्यता वाढेल. व्हिडीओमध्ये गुरप्रीत सिंग संधू म्हणाला की, “नमस्कार भारत, प्रत्येक वेळी प्रमाणे आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. आमचा पुढचा सामना कतारविरुद्ध असेल, जो विश्वचषक पात्रतेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हे स्वप्न पूर्ण होऊ द्या. आम्हाला जगण्याचा प्रयत्न करा आमचा सामना रात्री 9:15 वाजता सुरू होईल, चला एकत्र इतिहास घडवूया.
भारत पुढच्या टप्प्यात प्रवेश करणार का?
एएफसी पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीत भारताचा अ गटात समावेश आहे. सध्या हा संघ ५ गुणांसह गटात दुसऱ्या स्थानावर आहे, पण अफगाणिस्तानचेही तेवढेच गुण आहेत. या गटातील टॉप-2 संघ सौदी अरेबियात होणाऱ्या 2027 AFC आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. कतार आधीच पुढच्या टप्प्यासाठी पात्र ठरला आहे आणि जर भारत आज जिंकला तर पुढच्या टप्प्यात जाण्याची शक्यता वाढेल. पण पराभव झाल्यास गोल फरक जास्त राहणार नाही याची काळजी भारताला घ्यावी लागेल. भारत हरला तर अफगाणिस्तान आणि कुवेत यांच्यातील सामन्यावर अवलंबून राहावे लागेल.