विश्वचषक क्रिकेटचा अंतिम सामन्याचं (World Cup Final 2023) पहिलं सत्र संपल असून सामन्याची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी शेवटच्या काही षटकात भारताच्या खेळाडूंनी हळुवार खेळी करत 240 धावा पुर्ण केल्या. आता भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे माफक धावांच आव्हान दिलं आहे.
[read_also content=”बोगद्यात अडकलेल्या कामगारांना नैराश्यातून वाचवण्यासाठी पाठवली औषधं, खाण्यासाठी सुके मेवे https://www.navarashtra.com/india/41-labours-trapped-in-uttarkashi-tunnel-collapse-uttarakhand-482000.html”]
वर्ल्ड कप २०२३ च्या फायनलमध्ये भारताची सुरुवात काही खास झाली नाही. उपांत्य फेरीत भारताचे हिरो ठरलेले संघाचे तीन स्टार फलंदाज लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले. या तीन फलंदाजांमध्ये कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्माने ४७ धावांची खेळी खेळली जी त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतही खेळली होती. पण श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल अतिशय स्वस्तात परतले.
विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने निर्धारित 50 षटकात 240 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने 54 तर राहुलने 66 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने तीन तर हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे माफक आव्हान मिळाले आहे. आता ऑस्ट्रेलिया 241 धावांचे आव्हान कसे पुर्ण करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.