फोटो सौजन्य – X
ख्रिस वोक्स सामन्याबाहेर होणार? : भारताचा संघ इंग्लड दौऱ्यावरील त्याचा शेवटचा सामना हा सुरु आहे. त्यानंतर भारताचा संघ हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, त्याचबरोबर आशिया कपदेखील खेळवला जाणार आहे. सध्या भारताचा संघाला सुरु असलेल्या सामन्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. पहिल्या दिवशी भारताच्या संघाने ६ विकेट्स गमावले आहेत. यामध्ये टीम इंडीयाने 204 धावा केल्या आहेत. आता भारताचा संघ आजच्या सामन्यामध्ये करुण नायर आणि वॅाशिंग्टन सुंदर हे दोघे दुसऱ्या दिनाची सुरुवात करणार आहेत.
ओव्हल येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी गमावून २०४ धावा केल्या. करुण नायरने शानदार अर्धशतक झळकावले. इंग्लंडचा स्टार गोलंदाज ख्रिस वोक्स सामन्यादरम्यान जखमी झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. आता एका सहकारी खेळाडूने त्याच्या दुखापतीबद्दल वाईट बातमी दिली आहे.
पत्रकार परिषदेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन दिसला. ख्रिस वोक्सच्या दुखापतीबद्दल अपडेट देताना तो म्हणाला, ‘मला जास्त माहिती नाही पण ते योग्य दिसत नाही. हा मालिकेतील शेवटचा सामना आहे आणि दुखापत होणे ही वाईट गोष्ट आहे. हे असे मैदान आहे जिथे जर तुम्ही योग्य गोलंदाजी केली नाही तर तुम्हाला खूप धावा मिळतील. जर आपण त्यांना २३०-२४० पर्यंत मर्यादित ठेवले तर ते चांगले होईल.’
काही काळानंतर गस अॅटकिन्सनने बीबीसीला मुलाखत दिली आणि त्यात तो वोक्सबद्दल म्हणाला, ‘जर त्याने पुढे खेळात भाग घेतला तर मला आश्चर्य वाटेल.’ अॅटकिन्सनच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की वोक्सची दुखापत गंभीर आहे आणि तो ५ व्या कसोटी सामन्यातून बाहेर पडू शकतो. जर वोक्स पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी आला तर ते आश्चर्यापेक्षा कमी नसेल.
Gus Atkinson on Chris Woakes: I don’t know too much but doesn’t look too great. Last game of the series, big shame. It’s a ground where if you don’t bowl well, you can get hit of runs. If we can keep them down to 230-240, it will be good. — Sahil Malhotra (@Sahil_Malhotra1) July 31, 2025
गस अॅटकिन्सनने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिले ४ सामने खेळले नाहीत आणि आता तो ओव्हल कसोटीचा भाग आहे. दुखापतीमुळे तो बाहेर होता पण आता तो तयार आहे. अॅटकिन्सनने असेही म्हटले की तो जबाबदारी घेण्यास आणि गोलंदाजीचा भार त्याच्या खांद्यावर घेण्यास पूर्णपणे तयार आहे. तो म्हणाला, ‘अर्थात, मी ताजेतवाने वाटत आहे आणि चांगले करत आहे. मला माहित आहे की माझ्याकडे फक्त हा एकच सामना आहे. म्हणूनच मी खेळताना माझ्या मर्यादा ओलांडू शकतो.’