Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ Live : टीम इंडियाला दुसरा झटका, गिल पोठोपाठ विराट कोहलीही बाद

India vs New Zealand ICC Champion Trophy Match 2025 Live Scorecard : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा फायनलचा सामना रंगला आहे, सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर खिळल्या आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 09, 2025 | 08:01 PM
फोटो सौजन्य - Star Sports

फोटो सौजन्य - Star Sports

Follow Us
Close
Follow Us:

Ind Vs NZ Live Scoreboard Champion Trophy 2025 : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यांमध्ये जो संघ विजय होणार आहे तो संघ चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चा विजेता होणार आहे. भारताच्या संघाने या स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर न्यूझीलंडच्या संघाचा या स्पर्धेमध्ये एक पराभव झाला आहे यामध्ये भारताच्या संघाने किवी संघाला लीग सामन्यांमध्ये पराभूत केले होते. आता या सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. आजचा सामना दोन्ही संघासाठी फारच महत्वाचा आहे.

दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर प्रेक्षकांची नजर असणार आहे. भारतच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी केली आहे. तर मिचेल सँटनर आयसीसी स्पर्धेचे पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळत आहे. भारताच्या संघाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर न्यूझीलंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.

The liveblog has ended.
  • 09 Mar 2025 07:55 PM (IST)

    09 Mar 2025 07:55 PM (IST)

    टीम इंडियाला दुसरा झटका, गिल पोठोपाठ विराट कोहलीही बाद

    टीम इंडियाला पहिला धक्का, शुभमन गिलच्या रुपाने बसला होता. मात्र त्याच्या पाठोपाठ विराट कोहलीही बाद झाला. त्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये सावरलेल्या डावाला थोडा ब्रेक लागला आहे.  ३१ धावावर गिल बाद झाला. ग्लेन फिलिप्सने एक अद्भुत झेल घेतला. रोहित आणि शुभमन गिल यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. दोघांनीही १७ षटकांत १०० धावा जोडल्या. या स्पर्धेत प्रथमच कोणत्याही संघाच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली आहे.

    CT 2025. WICKET! 19.1: Virat Kohli 1(2) lbw Michael Bracewell, India 106/2 https://t.co/uCIvPtzs19 #INDvNZ #ChampionsTrophy #Final

    — BCCI (@BCCI) March 9, 2025

  • 09 Mar 2025 07:23 PM (IST)

    09 Mar 2025 07:23 PM (IST)

    रोहीत शर्माची तुफान फटकेबाजी, ४१ चेंडूत अर्धशतक पूर्ण

    रोहित शर्माने ४१ चेंडूत अर्धशतक झळकावले. कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसीच्या अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी खेळली. रोहितने या स्पर्धेतही पहिले अर्धशतक झळकावले आहे.

    FIFTY!

    A quick-fire half-century for Captain @ImRo45 in the Finals of the Champions Trophy 👏👏

    Live - https://t.co/uCIvPtzZQH #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/sJP4ZRhwNH

    — BCCI (@BCCI) March 9, 2025

     

  • 09 Mar 2025 06:58 PM (IST)

    09 Mar 2025 06:58 PM (IST)

    भारताची चांगली सुरुवात, रोहित शर्मा आणि गिल क्रीजवर

    टीम इंडिया न्यूझीलंडच्या २५२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आहे. टीम इंडियाचा आत्मविश्वासही दांडगा आहे. दरम्यान सध्या कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानावर असून संगाला चांगली सुरुवात करून दिली आहे.  रोहितने या स्पर्धेत आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. आजच्या अंतिम सामन्यात त्याला चांगली संधी आहे.

    CT 2025. 5.3: Nathan Smith to Rohit Sharma 6 runs, India 37/0 https://t.co/uCIvPtzZQH #INDvNZ #ChampionsTrophy #Final

    — BCCI (@BCCI) March 9, 2025

  • 09 Mar 2025 06:01 PM (IST)

    09 Mar 2025 06:01 PM (IST)

    टीम इंडियाची अप्रतिम गोलंदाजी, न्यूझीलंडने टेकले गुडघे

    रोहित शर्माने ४७ वा षटक कुलदीप यादवला दिला आणि त्याने फक्त चार धावा दिल्या. अप्रतिम गोलंदाजी. १० षटकांत ४० धावा आणि २ विकेट्स घेतल्या.

    Innings Break!

    Clinical bowling effort from #TeamIndia bowlers as they restrict New Zealand to a total of 251/7 in the Finals of the Champions Trophy!

    Scorecard - https://t.co/OlunXdzr5n #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/F4WmHJ4wJR

    — BCCI (@BCCI) March 9, 2025

  • 09 Mar 2025 05:48 PM (IST)

    09 Mar 2025 05:48 PM (IST)

    न्यूझीलंडचा सहावा विकेट, ६३ धावावर मिशेलला धाडलं तंबूत

    मोहम्मद शमीच्या षटकात डॅरिल मिशेलने सलग दोन चौकार मारले पण तिसऱ्या चेंडूवर त्याची विकेट गेली. रोहितने त्याचा झेल घेतला. डॅरिल मिशेल ६३ धावा करून बाद झाला.

    Shami picks up his first wicket of the game and the well set batter, Darly Mitchell departs.

    Live - https://t.co/OlunXdzr5n #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/ynCo1HbHY4

    — BCCI (@BCCI) March 9, 2025

  • 09 Mar 2025 05:15 PM (IST)

    09 Mar 2025 05:15 PM (IST)

    वरुण चक्रवर्तीने न्यूझीलंडला दिला पाचवा धक्का, आघाडीचा निम्मा संघ तंबूत

    वरुण चक्रवर्तीने ग्लेन फिलिप्सची विकेट घेत न्यूझीलंडला पाचवा झटका दिला. त्याने स्पर्धेत ९ विकेट्स घेतल्या आहेत. जर त्याने आणखी एक विकेट घेतली तर तो मॅट हेन्रीची बरोबरी करणार आहे.

    Varun Chakaravarthy, yet again with the breakthrough!

    Glenn Phillips is bowled out for 34 runs.

    Live - https://t.co/OlunXdzr5n #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/bBBS2QRqah

    — BCCI (@BCCI) March 9, 2025

  • 09 Mar 2025 04:51 PM (IST)

    09 Mar 2025 04:51 PM (IST)

    IND Vs NZ Live : न्यूझीलंडच्या फलंदाजांची मोठ्या भागीदारीकडे वाटचाल

    IND Vs NZ Live Scorecard : न्यूझीलंड संघाला चार धक्के बसले असून त्यांचे बलाढ्य फलंदाज बाद झाले आहेत. भारताच्या माऱ्यापूढे त्यांनी नांगी टाकली आहे. परंतु, मैदानावर असणारे न्यूझीलंडचे फलंदाज डॅरिल मिशेल आणि  ग्लेन फिलिप्स ही मात्र मोठ्या भागीदारीकडे वाटचाल करत आहेत. खेळ संथ असला तरी ते आपली विकेट्स टिकवून आहे. डॅरिल मिशेल 40 धावांवर तर ग्लेन फिलिप्स 26 धावांवर खेळत आहेत.

    न्यूझीलंडचा डाव-

    154/4  (35.3ओव्हर)

  • 09 Mar 2025 04:20 PM (IST)

    09 Mar 2025 04:20 PM (IST)

    IND Vs NZ Live : रवींद्र जाडेजाच्या फिरकीने दिला न्यूझीलंडला चौथा झटका..

    IND Vs NZ Live Scorecard : रवींद्र जाडेजाने  न्यूझीलंडला चौथा झटका दिल आहे. त्याने टॉम लॅथम एलबीडब्लू आऊट  केले. टॉम लॅथमने  30 चेंडूत 14 धावा केल्या आहेत.  न्यूझीलंडच्या 110 धावांवर 4 विकेट्स गेल्या आहेत.

    न्यूझीलंडचा डाव-

    110/4  (24.2ओव्हर)

    Ravindra Jadeja picks up his first wicket as Tom Latham is given out LBW!

    Live - https://t.co/OlunXdyTfP #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/6gWZ07L7cG

    — BCCI (@BCCI) March 9, 2025

  • 09 Mar 2025 04:11 PM (IST)

    09 Mar 2025 04:11 PM (IST)

    IND Vs NZ Live : भारतीय गोलंदाजांचा टिच्चून मारा..

    IND Vs NZ Live Scorecard : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात टीम इंडियाचा टिच्चून मारा सुरू आहे. त्यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले आहे. न्यूझीलंडच्या तीन विकेट्स गेल्या असून टॉम लॅथम आणि डॅरिल मिशेल खेळत आहेत. भारताकडून कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या आहे तर वरुनने एक विकेट घेतली आहे.

    न्यूझीलंडचा डाव-

    106/3  (22.2ओव्हर)

  • 09 Mar 2025 03:37 PM (IST)

    09 Mar 2025 03:37 PM (IST)

    IND Vs NZ Live : भारताच्या झोळीत तिसरा विकेट

    IND Vs NZ Live Scorecard : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात टीम इंडियाच्या झोळीत तिसरा विकेट आला आहे. कुलदीप यादवने या सामन्यात दुसरा विकेट घेतला आणि टीम इंडियासाठी तिसरा विकेट मिळवून दिला आहे. कुलदीप आधी रचिन रवींद्र आणि आता केन विल्यमसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.

    ८१/३ (१३.५ ओव्हर)

    .@imkuldeep18 right on the money.

    Picks up his second wicket as Kane Williamson is caught and bowled for 11 runs 👏👏

    Live - https://t.co/OlunXdzr5n #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/cddLceHDWz

    — BCCI (@BCCI) March 9, 2025

  • 09 Mar 2025 03:25 PM (IST)

    09 Mar 2025 03:25 PM (IST)

    IND Vs NZ Live : कुलदीपने रचिन रवींद्रला फिरकीत फसवलं

    IND Vs NZ Live Scorecard : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने रचिन रवींद्रला फसवून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. रचिन रवींद्रने संघासाठी ३७ धावांची खेळी खेळली.

    ६९/२ (१०.१ ओव्हर)

  • 09 Mar 2025 03:21 PM (IST)

    09 Mar 2025 03:21 PM (IST)

    IND Vs NZ Live : पहिला पॉवर प्ले संपला, टीम इंडियाच्या झोळीत विकेट

    IND Vs NZ Live Scorecard : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात 10 ओव्हरचा खेळ संपला आहे. या पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताच्या संघाने 1 विकेट घेऊन 69 धावा दिल्या आहेत.

    69/1 (10.0 ओव्हर)

  • 09 Mar 2025 03:14 PM (IST)

    09 Mar 2025 03:14 PM (IST)

    IND Vs NZ Live : भारताच्या हाती लागला पहिला विकेट

    IND Vs NZ Live Scorecard : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारताच्या हाती पहिला विकेट लागला आहे. टीम इंडियाचा मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्तीने त्याची जादू दाखवली आहे. वरुणने विल यंगला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.

    57/1 (7.5 ओव्हर)

    A much needed breakthrough for #TeamIndia.

    Varun Chakaravarthy strikes as Will Young is out LBW!

    Live - https://t.co/OlunXdzr5n #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/JJoQdb3N1B

    — BCCI (@BCCI) March 9, 2025

  • 09 Mar 2025 03:12 PM (IST)

    09 Mar 2025 03:12 PM (IST)

    IND Vs NZ Live : ८ व्या ओव्हरमध्ये रचिन रवींद्रला जीवनदान

    IND Vs NZ Live Scorecard : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात ८ व्या ओव्हरमध्ये दोन वेळा जीवनदान मिळाले आहे. सध्या आठव्या ओव्हरमध्ये श्रेयस अय्यरने रचिन रवींद्रचा कॅच सोडला.

  • 09 Mar 2025 02:56 PM (IST)

    09 Mar 2025 02:56 PM (IST)

    IND Vs NZ Live : 5 ओव्हरचा खेळ समाप्त

    IND Vs NZ Live Scorecard : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात 5 ओव्हरचा खेळ झाला आहे, यामध्ये भारताच्या संघाने 37 धावा दिल्या आहेत.

    37/0 (5 ओव्हर)

  • 09 Mar 2025 02:42 PM (IST)

    09 Mar 2025 02:42 PM (IST)

    IND Vs NZ Live : २ ओव्हरचा खेळ संपला

    IND Vs NZ Live Scorecard : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये शमीने 4 धावा दिल्या तर हार्दिक पंड्याने दुसरी ओव्हर टाकली यामध्ये त्यामध्ये हार्दिकने 2 धावा दिल्या.

    6/0(2 ओव्हर)

  • 09 Mar 2025 02:23 PM (IST)

    09 Mar 2025 02:23 PM (IST)

    रोहित शर्माने सलग १५ व्या वेळी गमावला नाणेफेक

    भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावली. रोहितने टॉस गमावण्याची ही सलग १५ वी वेळ आहे, परंतु टीम इंडियाने टॉस गमावल्याने देशभरात आनंदाचे वातावरण आहे.

  • 09 Mar 2025 02:11 PM (IST)

    09 Mar 2025 02:11 PM (IST)

    IND Vs NZ Live : फायनलच्या सामन्यात जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

    IND Vs NZ Live Scorecard : न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची Playing 11

    रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.

    टीम इंडियाविरुद्ध न्यूझीलंड संघाची Playing 11

    विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क, नाथन स्मिथ.

  • 09 Mar 2025 02:05 PM (IST)

    09 Mar 2025 02:05 PM (IST)

    IND Vs NZ Live : नाणेफेकचा निर्णय, मिचेल सँटनरची टोळी करणार फलंदाजी

    IND Vs NZ Live Scorecard : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा शुभारंभ झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघाकडे पहिले गोलंदाजीचे आव्हान असणार आहे.

    CT 2025. New Zealand won the toss and elected to bat. https://t.co/uCIvPtzZQH #INDvNZ #ChampionsTrophy #Final

    — BCCI (@BCCI) March 9, 2025

  • 09 Mar 2025 01:18 PM (IST)

    09 Mar 2025 01:18 PM (IST)

    IND Vs NZ Live : विराट कोहलीला फायनलच्या सामन्यात इतिहास रचणार

    IND Vs NZ Live Scorecard : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आज त्याचा ५५० वा सामना खेळणार आहे. कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५४९ सामने खेळले आहेत आणि त्यात २७५९८ धावा केल्या आहेत. विराटने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८२ शतके केली आहेत. सचिनचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला आणखी १९ शतके करावी लागणार आहेत.

  • 09 Mar 2025 01:17 PM (IST)

    09 Mar 2025 01:17 PM (IST)

    Ind Vs NZ Live : दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

    Ind Vs NZ Live Scorecard : भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

    रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.

    न्यूझीलंडचा संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

    विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कॅप्टन), काइल जेमिसन, विल्यम ओ'रोर्क आणि मॅट हेन्री/नाथन स्मिथ.

Web Title: India vs new zealand icc champion trophy match 2025 live cricket scorecard 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025 final

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.