फोटो सौजन्य - Sri Lanka Cricket
भारत विरुद्ध श्रीलंका : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज दुसरा सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी २.३० वाजता सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता म्हणजेच ड्रॉ झाला होता. आता दुसऱ्या सामन्यातून दोन्ही संघांना मालिकेतील पहिला विजय मिळवायचा आहे. आज जर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर टीम इंडिया विजयाचे शतक ठोकणार आहे.
आत्तापर्यंत भारत आणि श्रीलंका यांच्यात १६९ वनडे सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने यापैकी ९९ सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने ५७ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाने आज विजय मिळवला तर श्रीलंकेविरुद्धच्या वनडेतील विजयाचे शतक पूर्ण होईल. या दोघांमधील एकूण ११ सामने अनिर्णित आणि २ बरोबरीत राहिले. ९९ सामन्यांमध्ये भारताने घरच्या मैदानावर ४० सामने, ३२ बाहेर आणि 27 तटस्थ सामने जिंकले आहेत. या दोघांमधील हेड टू हेड पाहता, श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट होतो. अशाप्रकारे आज टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार असल्याचे दिसून येत आहे. आता आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पहिल्या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये श्रीलंकेच्या संघाने भारतासमोर २३० धावांचे लक्ष्य उभे केलं होते. परंतु भारताच्या संघाने हा सामना २३० धावा करून बरोबरी केली सामना अनिर्णयीत राहिला. त्याचबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्माने त्याचे अर्धशतक देखील पूर्ण केले.