'Sometimes distance is for you..', Phulrani's fans are pleasantly surprised; Saina Nehwal and husband Parupalli Kashyap are together again
Saina Nehwal and husband Parupalli Kashyap reunited : भारताची ऑलिंपिक पदक विजेती अनुभवी बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप एकमेकांपासून वेगळी झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या दोघांनी वेगळे होण्याच्या बातमीने क्रीडा विश्वाला धक्का बसला होता. सायना नेहवालने १३ जुलै रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे पती-पत्नी वेगळे होत असल्याची माहिती दिली होती. या दोघांनी २०१८ मध्ये विवाह केला होता. ७ वर्षांनंतर पारुपल्ली आणि सायना वेगळे झाले होते. तेव्हा सगळ्यांना वाटत होतं या दोघांनी एकत्र राहावं. मात्र तेव्हा ते खरं होऊ शकलं नाही. परंतु आता सायनाच्या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सानिया नेहवाल आणि पती पारुपल्ली कश्यप पुन्हा एकत्र आले आहेत. या बाबत सायनाने एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. यामध्ये एका फोटोमध्ये सायना आणि कश्यपसोबत आहेत. त्या फोटोवर तिने लिहिले आहे की “कधीकधी अंतर तुम्हाला उपस्थितीचे मूल्य शिकवते. येथे आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत.”
हेही वाचा : ENG vs IND : भारतासाठी नाईट वॉचमॅन ठरला तारणहार! Akash Deep चे तगडे अर्धशतक..
सायना आणि भारताचा माजी नंबर-१ पुरुष बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यप हे मागील महिन्यात वेगळे झाले होते. याबाबत सायनाने माहिती देखील दिली होती. मात्र आता ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. सायना नेहवालने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो पोसत केला आहे. यामध्ये भारताची ऑलिंपिक पदक विजेती अनुभवी बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप सोबत उभे आहेत. सायनाने या फोटोला छान कॅपशन देखील लिहिले आहे. तिने लिहिले आहे कि “कधीकधी अंतर तुम्हाला उपस्थितीचे मूल्य शिकवत असते. येथे आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत.” या फोटोवर चाहत्यांकडून या दोन स्टार जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
सायना नेहवाल आणि तिचा पती कश्यपच्या फोटोवर वापरकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. या जोडीला सोबत बघून लोक आनंदित दिसत आहेत. काहींनी लिहिलं आहे की,”तुम्हा दोघांसाठी मी आनंदित आहे.”, तर एकाने लिहिलं आहे की, “हे खूप छान आहे. तुम्हा दोघांचेही कौतुक. मुक्त संवाद आणि प्रामाणिक प्रयत्न शेवटपर्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही दोघेही एकत्र राहून ते करत आहात हे पाहून आनंद झाला आहे.” तर एका वापरकर्त्याने म्हटले आहे की,”मन आनंदित झाले आहे.” अशा प्रकारे वापरकर्त्यांकडून सायना आणि तिच्या पतीला प्रेम मिळत आहे.
हेही वाचा : IND vs ENG : केएल राहुलची नामी संधी हुकली! सुनील गावस्करचा विक्रम मोडण्यात अपयश, ‘इतक्या’ धावांनी केला घात
भारतीय स्टार सायनाने रविवारी, १३ जुलै रोजी रात्री उशिरा इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये तिने लिहिले होते की, “आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जात असते. खूप विचार केल्यानंतर, पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, प्रगती निवडत आहोत आणि सावरत आहोत” अशी माहिती सायनाने दिली होती. त्यानंतर आता कश्यप आणि सायना हे पति-पत्नी एकत्र दिसल्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.