आकाश दीप(फोटो-सोशल मीडिया)
ENG vs IND : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पाचवा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताचा डाव गडगडला होता.भारत पहिल्या डावात २२४ धावांवर गारद झाला. मात्र भारताने हार मानली नाही. भारताच्या २२४ धावांना प्रतिऊत्तरात इंग्लंड संघ मैदानात उतरला. तेव्हा भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत इंग्लंडच्या संघाला २४७ धावांवर रोखला.
भारतकडून सिराज आणि प्रसिध कृष्णा या जोडीने इंग्लंडला धक्के दिले. इंग्लंडने नाममात्र २३ धावांची आघाडी घेतली होती. प्रतिउत्तरात भारताने दुसर्या डावात दुसऱ्या दिवसाअखेर संपेपर्यंत २ विकेट्स गमावून ५२ धावांची आघाडी घेतली होती.यशस्वी जैस्वाल(५१) आणि आकाश दीप(४०)हे नाबाद होते.
हेही वाचा : ‘विराट बाथरुममध्ये रडत बसला..’, त्यावेळी नेमकं काय घडल? युझवेंद्र चहलने केला मोठा खुलासा
भारत तिसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी यशस्वी जैस्वाल आणि नाईट वॉचमॅन आकाश दीप या जोडीने पहिला तास शानदार पद्धतीने खेळून काढला. इतकंच नाही तर या दोघांनी आक्रमकपणे धावा केल्या होत्या. या दरम्यान नाईट वॉचमॅन आकाश दीपने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. एखाद्या फलंदाजाला देखील लाजवेल अशी फलंदाजी केली.
आकाश दीपने भारताच्या डावातील ३८ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावत कारकीर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केलं. आकाशने ७२.८६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. यामध्ये त्याने १२ चौकार लगावले. आकाशच्या या अर्धशतकी खेळीनंतर भारतीय ड्रेसिंग रुममधील भारतीय खेळाडूंनी देखील त्याच्या खेळीचे उभ राहून कौतुक केले. इतकंच काय नेहमी गंभीर भाव मुद्रा असणाऱ्या मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला देखील हसू आवरता आला नाही.
भारताने दुसऱ्या दिवशी १७७ धावांवर आकाश दीपची विकेट गमावली. ही भारताची तिसरी विकेट होती.तत्पूर्वी आकाश दीपने जैस्वालच्या साथीने भारताच्या धावांचा वेग वाढवला. आकाश दीपने कधी एक धाव, तर कधी दोन. वेळेवर शानदार चौकार देखील लगावले. आकाशने अशाप्रकार अविस्मरणीय असे अर्धशतक झळकावले. त्याला जेमी ओव्हरटनने बाद केले. आकाश दिपने ९४ चेंडूत ६६ धावा केल्या. यामध्ये त्याने १२ चौकार लगावले.
हेही वाचा : IND vs ENG : केएल राहुलची नामी संधी हुकली! सुनील गावस्करचा विक्रम मोडण्यात अपयश, ‘इतक्या’ धावांनी केला घात