भारताच्या हॉकी संघाने स्पेनला २-१ असे पराभूत करून कांस्य पदकावर कब्जा केला आहे. फोटो सौजन्य - Hockey India
भारताच्या हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत भारतासाठी १० गोल केले आहेत.
भारताच्या हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवले आहे, टोकियोमध्ये भारताने जर्मनीला पराभूत केले होते तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाने स्पेन ला पराभूत करून कांस्य पदकावर कब्जा केला.
भारताची वॉल म्हणून पीआर श्रीजेशचे नाव पुढे केले जाते, त्याच्या या निवृत्तीच्या शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय प्रेक्षक देखील भावुक होताना दिसले.
भारताचा अनुभवी खेळाडू अमित रोहिदास याला क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये रेड कार्ड देऊन एक सामन्यासाठी बॅन करण्यात आले होते त्याने ब्रॉन्झ मेडल मॅचच्या सामन्यामध्ये पुनरागमन करून भारताला विजय मिळवून दिला.
भारताचा स्टार आणि दिग्गज गोलकिपर पीआर श्रीजेशने त्याचा करियरचा शेवटचा सामना खेळाला आणि भारताच्या हॉकी संघाने हे ब्रॉन्झ मेडल त्याच्यासाठी डेडिकेट केले आहे.
भारताच्या हॉकी संघाने पीआर श्रीजेशला फेअरवेल देण्यासाठी त्याला मान देण्यासाठी वाकून नमस्कार केला.