
Indian team announced for Asian Cup qualifiers: 'These' football players have been called up against Bangladesh
Indian team announced for Asian Cup qualifiers: भारतीय फुटबॉल संघ बांगलादेशविरुद्धच्या औपचारिक आशियाई कप पात्रता फेरीचा सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय फुटबॉल संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्याकडून बुधवारी बांगलादेशविरुद्धच्या औपचारिक आशियाई कप पात्रता फेरीसाठी २३ सदस्यीय संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये करिष्माई स्ट्रायकर सुनील छेत्रीचा समावेश करण्यात आला नव्हता. हा सामना १८ नोव्हेंबर रोजी ढाका येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ २०२७ मध्ये सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला आहे. गेल्या महिन्यात मडगाव येथे सिंगापूरकडून भारतीय संघाला २-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता. नंतर यादीत आणखी खेळाडूंचा समावेश केला जाईल असे समजते.
अंतिम संघात सहसा २३ खेळाडू असतात. छेत्रीचे नाव यादीत समाविष्ट केले जाईल की नाही हे अद्याप माहित नाही. त्याने आपली निवृत्ती मागे घेऊन पात्रता फेरीत खेळण्याचा निर्णय घेतला होता, परंतु भारत पात्र ठरू शकला नाही. सुपर कप सेमीफायनल २६ नोव्हेंबरपूर्वी होणार नाही, कारण त्याच दिवशी बगदादमध्ये एएफसी चॅम्पियन्स लीग २ गटातील सामन्यात एफसी गोवाचा सामना अल झवरा एससीशी होईल. आत्तापर्यंत प्रशिक्षकाचा बेधडक निर्णय भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षकपद सांभाळल्यापासून मुख्य कोच खालिद जमील यांनी अनेक बेधडक निर्णय घेतले आहे.