यश राठोड(फोटो-सोशल मीडिया)
Yash Rathore’s performance in Ranji Trophy : २०२५-२६ रणजी करंडक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत, विदर्भाच्या यश राठोडने तामिळनाडूविरुद्ध शानदार शतक झालकवले असून भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये एक नवीनच विक्रम प्रस्थापित केला आहे. राठोडने तामिळनाडूविरुद्ध १३३ धावांची शानदार खेळी साकारली, या खेळीने केवळ संघालाच तारळे नाही तर त्याच्या कारकिर्दीची आकडेवारी देखील वाढवली आहे.
या हंगामात आतापर्यंत त्याने दुलीप करंडक, इराणी आणि रणजी करंडक यासह सात सामन्यांमध्ये ११०.७ च्या मोठ्या सरासरीने ७७५ धावा फटकावल्या आहेत. सोमवारी त्याने साकारलेल्या खेळीमुळे राठोड भारतीय क्रिकेटमधील काही मोठ्या नावांपेक्षा पुढे गेला आहे. त्याच्याकडे आता ६० च्या सरासरीने २,२८० धावा जमा आहेत. ज्या भारतीय फलंदाजांमध्ये किमान २००० धावांसह सहाव्या क्रमांकाच्या प्रथम श्रेणी सरासरीच्या यादीत समाविष्ट आहे.
राठोडने या खेळीसह भारताचे महान फलंदाज विजय हजारे (५८.३८) आणि विनोद कांबळी (५९.६७) यांना देखील पिछाडीवर सोडले आहे. तो आता ६० किंवा त्याहून अधिक सरासरीने किमान २००० प्रथम श्रेणी धावा करणाऱ्या फक्त १२ खेळाडूंपैकी एक असून द्विशतक न करता अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
मागील वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये राठोड सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता, त्याने १० सामन्यांमध्ये ९६० धावा केल्या होत्या. यावेळी देखील त्याची बॅट त्याच ताकदीने धावा काढत आहे. भविष्यात भारतीय क्रिकेटमध्ये एक अत्यंत विश्वासार्ह कसोटी फलंदाज असू शकतो याची चिन्हे आता दिसू लागले आहेत.
विजय हजारे आणि विनोद कांबळी यांच्या सरासरीला मागे टाकल्यानंतर, यश राठोडने चर्चेदरम्यान या वर्षासाठीच्या त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले असून तो म्हणाला की, “मला या वर्षी द्विशतक साजरे करायचे आहे आणि व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये देखील सुधारणा करायची आहे.” तसेच तो लांब डाव खेळण्यांबद्दल म्हणाला की, “मी यासाठी एनसीएची भूमिका महत्त्वाची मानतो. ते आम्हाला सर्व प्रकारच्या खेळपट्ट्या पुरवत असतात.”
हेही वाचा : IND vs AUS T20 : मिचेल मार्शने नाणेफेक जिंकले पहिले करणार गोलंदाजी, वाचा दोन्ही संघाची Playing 11
हजारे आणि कांबळी यांना मागे टाकण्याबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला की, “ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असून मी माझ्या मोठ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत आहे. माझ्या मागे कठोर परिश्रम करणाऱ्या सर्वांचे मी आभारी मानतो. मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करत राहू इच्छितो आणि लवकरच स्वतःला देशासाठी खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.”






