IND Vs ENG: India's headache will increase before Lord's Test! 'This' fast bowler will return to England's squad
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघाने ५८७ धावा उभ्या केल्या आहेत. यामध्ये भारतीय कर्णधार शुभमन गिलने २६९ धावा, रवींद्र जाडेजा ८७ आणि सलामीवीर यशस्वी जयस्वाल ८५ धावा फटकावल्या होत्या. इंग्लंडच्या गोलंदाजांची कमकुवत बाजू पहिल्या डावात दिसून आली. आता संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक जीतन पटेल यांनी जोफ्रा आर्चर आणि जखमी गोलंदाज गस अॅटकिन्सन यांच्याबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्यांनी सांगितले की, दोन्ही गोलंदाज आता पूर्णपणे तंदुरुस्त आहेत.
जीतन पटेल म्हणाले की, १० जुलैपासून लॉर्ड्स येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवड पर्यायांमध्ये दोन्ही गोलंदाजांचा विचार करण्यात येईल. भारताविरुद्ध एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही गोलंदाजांचा संघात स्थान देण्यात आले होते, परंतु या सामन्यासाठी इंग्लंडने त्यांच्या मागील प्लेइंग इलेव्हनला कायम राखले आहे. अशा परिस्थितीत, आर्चर आणि अॅटकिन्सन यांना अंतिम अकरा जणांमध्ये संधी मिळू शकली नाही.
हेही वाचा : IND vs ENG : एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडचा बोलबाला! शतक ठोकून Harry Brook कडून लीड्सची वसूली
चार वर्षांनंतर आर्चर कसोटी संघात पुनरागमन करणार आहे. त्याने चेस्टर-ले-स्ट्रीट येथे डरहम विरुद्ध ससेक्सचा चार दिवसांचा सामना खेळला असून ज्यामध्ये त्याने १८ षटकांत ३२ धावा देऊन एक विकेट चटकावली आहे. फलंदाजीत ३१ धावांची महत्त्वाची खेळी देखील केली आहे. जोफ्रा आर्चरने २०२३ च्या विश्वचषकापूर्वी इंग्लंडसाठी एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्ये पुनरागमन केले होते, परंतु तो खूप काळ कसोटी क्रिकेटपासून दूर राहिला आहे. त्याच्या पुनरागमनामुळे इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीत नवीन बळ येऊ शकते.
हेही वाचा : IND Vs ENG : जेमी स्मिथचे इंग्लंडकडून विक्रमी सर्वात जलद शतक; भारतीय गोलंदाजी निष्प्रभ
पटेल यांनी इंग्लंडचा सध्याचा गोलंदाज ब्रायडन कार्सच्या कामगिरीबाबतही प्रतिक्रिया दिली. या कसोटीच्या पहिल्या डावात कार्सेने २४ षटकांत ८३ धावा देऊन फक्त एक विकेट घेतली आहे. पटेल म्हणाले की, या दोन्ही कसोटी ब्रायडनसाठी आव्हानात्मक राहीलया होत्या. सुदैवाने, आम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीत चांगला ब्रेक मिळालाया आहे. पण ही वेगवान गोलंदाजी युनिटची ताकद असून तुम्ही खेळाडूंना फिरवू शकता.