फोटो सौजन्य - सोशल मीडिया
ऑलिम्पियाड 2024 : कालपासून बुडापेस्ट, हंगेरी येथे ऑलिम्पियाड 2024 ला सुरुवात झाली आहे. यामध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघानी दमदार सुरुवात करत विजयाची सलामी दिली आहे. यामध्ये भारतीय पुरुष संघामध्ये आर. प्रग्नानंदा, विदित गुजराथी, अर्जुन एरिगाईसी आणि पी. हरिकृष्ण यांचा समावेश आहे. तर महिला संघामध्ये आर. वैशाली, तानिया सचदेव, दिव्या देशमुख, वांतिका असा महिला संघ आहे. यामध्ये भारताच्या पुरुष संघाने एकही सामना न गमावता दमदार कामगिरी करत मोरोकोला ४-० ने पराभूत करून स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिला विजय मिळवला आहे.
महिला चेस संघाबद्दल बोलायचं झालं तर संघाने त्यांच्या पहिल्या राउंडमध्ये महिला विभागात सध्या भारताची जमैकावर २-० अशी आघाडी आहे. आर. वैशालीने अदानी क्लार्कचा पराभव केला, तर तानिया सचदेवने गॅब्रिएला वॉटसनवर विजय मिळवला. भारताच्या महिला चेस संघाने जमैकावर ३.५ -०.५ असा विजय मिळवला आहे. वांतिका अग्रवाल हिची पहिल्या फेरीमध्ये बरोबरी झाली त्यांनी दोन्ही देशामधील खेळाडूंना गुण सामान देण्यात आले. पुरुष संघाच्या खेळाबद्दल बोलायचं झालं तर चारही खेळाडूंनी दमदार कामगिरी करत कमालीची कामगिरी केली आहे.
या स्पर्धेचे सर्व सामने बुडापेस्ट वेळेनुसार 15.00 वाजता किंवा IST 18:30 वाजता सुरू होत आहेत. त्यानंतर या सामान्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 चे थेट प्रवाह FIDE YouTube चॅनेलवर उपलब्ध असणार आहे. भारतात बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ च्या प्रसारणासाठी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 – आगमन, उद्घाटन समारंभ आणि तांत्रिक बैठक
बुधवार, 11 सप्टेंबर 2024 – फेरी 1
गुरुवार, 12 सप्टेंबर 2024 – फेरी 2
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2024 – फेरी 3
शनिवार, 14 सप्टेंबर 2024 – फेरी 4
रविवार, 15 सप्टेंबर 2024 – फेरी 5
सोमवार, 16 सप्टेंबर 2024 – फेरी 6
मंगळवार, सप्टेंबर, 17, 2024 – विश्रांतीचा दिवस — बर्म्युडा पार्टी
बुधवार, 18 सप्टेंबर 2024 – फेरी 7
गुरुवार, 19 सप्टेंबर 2024 – फेरी 8
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 – फेरी 9
शनिवार, 21 सप्टेंबर 2024 – फेरी 10
रविवार, 22 सप्टेंबर 2024 – फेरी 11