
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
पाकिस्तानची आजपासून ट्राय सिरीज सुरु झाली आहे. आज पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे. या पाकिस्तानच्या संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका पार पडली या मालिकेमध्ये पाकिस्तानने कमालीची कामगिरी केली आणि दक्षिण आफ्रिकेला दोन्ही मालिकांमध्ये पराभूत केले होते. पाकिस्तानचा संघ आणि खेळाडू हे नेहमीच वादात आढळतात. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहच्या घरी अंदाधुंद गोळीबार झाला.
१० नोव्हेंबर रोजी खैबर पख्तूनख्वा येथील नसीमच्या घरात अचानक हल्लेखोर घुसले आणि त्यांनी गोळीबार केला. नसीम सध्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची तयारी करत आहे आणि घरी नव्हता. तथापि, त्याचे कुटुंब उपस्थित होते आणि सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
पाकिस्तानी खेळाडू नसीम शाहचे घर खैबर पख्तूनख्वा येथील लोअर दिर जिल्ह्यातील मयार भागात आहे. १० नोव्हेंबर रोजी पाच हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर गोळीबार केला. नसीम शाह यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या कारचे मोठे नुकसान झाले, त्यांच्या खिडक्या तुटल्या. त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजालाही गोळ्यांचे मोठे छिद्र पडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्लेखोरांनी पळून जाण्यापूर्वी खिडकी, कार आणि मुख्य प्रवेशद्वाराचे नुकसान केले.
Breaking: Unidentified attackers open fire at Pakistan fast bowler Naseem Shah’s home in Lower Dir, damaging the gate, windows & vehicle. Miyaar Police register FIR, detain 5 suspects, probe underway, prayers for Naseem & family.#NaseemShah #LowerDir pic.twitter.com/gT6JkXJ9o3 — Cyber Spartan (@postbyghost) November 10, 2025
पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास केला. त्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली आणि आता तपास पूर्ण झाला आहे. सुदैवाने, नसीमच्या कुटुंबातील कोणीही जखमी झाले नाही आणि तो सुखरूप बचावला. या घटनेनंतर, मेयर पोलिसांनी सुरक्षा आणि अंमलबजावणी वाढवली आहे. नसीम शाहचे कुटुंब शांतताप्रिय आहे आणि त्यांच्यात कोणताही राग नाही असे अहवालात म्हटले आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका आजपासून सुरू होत आहे. दोन्ही देशांदरम्यान तीन सामने खेळले जातील आणि नसीम शाहची संघात निवड झाली आहे. हा सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणार होता आणि नसीम घरी नव्हता. तथापि, आता परिस्थिती शांत झाली आहे आणि सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नसीम आता त्याच्या राष्ट्रीय कर्तव्यांवर लक्ष केंद्रित करू शकतो.