Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 :’२० वर्षे IPL खेळण्याचे लक्ष्य ठेव, कोहलीला बघ..!’ माजी क्रिकेटपटूचा १४ वर्षीय Vaibhav Suryavanshi ला सल्ला.. 

राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून सर्वांना आश्चर्यचकित केले होते, या आक्रमक फलंदाजाला एका माजी क्रिकेटपटूने एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 26, 2025 | 07:53 AM
IPL 2025: 'Aim to play IPL for 20 years, look at Kohli..!' Former cricketer's advice to 14-year-old Vaibhav Suryavanshi..

IPL 2025: 'Aim to play IPL for 20 years, look at Kohli..!' Former cricketer's advice to 14-year-old Vaibhav Suryavanshi..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला आणि सर्वांना चकीत केले. आयपीएल लिलावात जेव्हा राजस्थानने या युवकासाठी कोट्यवधी रुपये मोजले, तेव्हापासून त्याची चर्चा होती. त्याला खेळण्याची संधी केव्हा मिळते, याची सर्व वाट पाहत होते. पहिल्याच सामन्यात त्याने त्याचे कौशल्य दाखवून दिले. पण, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने या खेळाडूला सल्ला दिला आहे.

हेही वाचा : CSK Vs SRH: कॅप्टन कूलच्या पदरी निराशाच; हैदराबादच्या ‘नवाबां’कडून चेन्नईचा 5 विकेट्सने पराभव

वैभवने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात २० चेंडूंत ३४ धावांची खेळी केली होती. यानंतर तो (१६) रॉयल चॅलेंजस बंगळुरूविरुद्ध आक्रमक खेळला, परंतु मोठ्या खेळीपासून वंचित राहिला. या सामन्यानंतर वीरूने आरआरच्या फलंदाजाला सल्ला दिला आहे. वैभवने २० वर्ष आयपीएल खेळण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवायला हवे आणि या वयात कोट्यवधी कमावल्यावर समाधानी राहायला नको. क्रिकबजसोबत बोलताना सेहवागने म्हटले की, त्याने असे बरेच खेळाडू पाहिलेत की जे एक किंवा दोन सामन्यांत चमकले आणि त्यानंतर काहीच करू शकले नाहीत.

हेही वाचा : PBKS vs KKR : पंजाबचा पहिल्या चारमध्ये येण्याचा प्रयत्न, तर केकेआरही विजयी रुळावर परतण्यास सज्ज; आज दोन्ही संघ आमनेसामने

विराट गाजवतोय १८वी आयपीएल स्पर्धा

सेहवाग म्हणाला, किमान २० वर्षे आयपीएलमध्ये खेळण्याचे लक्ष्य वैभवने ठेवायला हवं. विराट कोहलीला बघा, तो १९ वर्षांचा असल्यापासून खेळतोय आणि आता तो १८वी आयपीएल स्पर्धा गाजवतोय. वैभवनेही त्याचे अनुकरण करायला हवे. तो या आयपीएलपुरता आनंदीत असेल, आता आपण करोडपती बनलो, दणक्यात पदार्पण झालं, पहिल्या चेंडूवर षटकार खेचला, असा विचार करत असेल तर कदाचित तो पुढच्या आयपीएलमध्ये आपल्याला दिसणार नाही.

चेन्नई सुपर किंगला लय सापडे ना, हैद्राबादकडून दारुण पराभव..

काल आयपीएलचा ४३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायर्स हैदराबाद यांच्यात पार पडला.  चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवरच्या या सामन्यात हैद्राबादने चेन्नईला पराभवाची धूळ चारली. हैद्राबादच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर चेन्नईने प्रथम फलंदाजी करत १५३ धावा केल्या. प्रतिउत्तरात  हैदराबादने १९ व्या षटकात 154 धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि सुपर किंग्सचा 5 विकेट्सने पराभव केला. हैदराबादच्या विजयात  इशान किशन आणि अनिकेत वर्मा यांनी महत्वाची भूमिका बजावली.  आयपीएल २०२५ मधील ९ सामन्यात चेन्नईला ७ पराभव तर केवळ २ च विजय मिळवता आले. या पराभवाने चेन्नई गुणतालिकेत तळाला गेली आहे. तर हैद्राबादची देखील कामगिरी या हंगामात फारसी चांगली राहिलेली नाही. ९ सामन्यात त्यांना केवळ तीनच विजय मिळाले आहेत.

Web Title: Ipl 2025 aim to play ipl for 20 years virender sehwag advises vaibhav suryavanshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2025 | 07:51 AM

Topics:  

  • Virender Sehwag

संबंधित बातम्या

Virender Sehwag: ‘धोनीने टीममधून काढलं म्हणून संन्यास घेणार होतो…’ सेहवागचा धक्कादायक खुलासा
1

Virender Sehwag: ‘धोनीने टीममधून काढलं म्हणून संन्यास घेणार होतो…’ सेहवागचा धक्कादायक खुलासा

IND vs ENG 4th Test : ऋषभ पंत चढतोय यशाचे एक-एक इमले! कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत वीरेंद्र सेहवागशी साधली बरोबरी
2

IND vs ENG 4th Test : ऋषभ पंत चढतोय यशाचे एक-एक इमले! कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत वीरेंद्र सेहवागशी साधली बरोबरी

केएल राहुलने सईद अन्वर आणि वीरेंद्र सेहवागला टाकलं मागे! सुनील गावस्कर यांच्याशी जोडलं नाव
3

केएल राहुलने सईद अन्वर आणि वीरेंद्र सेहवागला टाकलं मागे! सुनील गावस्कर यांच्याशी जोडलं नाव

  ना क्रिस गेल, ना वीरेंद्र सेहवाग, तर ‘हा’ जगातील सर्वात घातक फलंदाज! Ab de villiers ने दिली ‘या’ फलंदाजाला पसंती..
4

  ना क्रिस गेल, ना वीरेंद्र सेहवाग, तर ‘हा’ जगातील सर्वात घातक फलंदाज! Ab de villiers ने दिली ‘या’ फलंदाजाला पसंती..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.