हैदराबादचा चेन्नईवर दणदणीत विजय (फोटो- ट्विटर)
Chennai Super Kings Vs Sunrisers Hyderabad IPL 2025: आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सनरायझर्स संघाने विजय मिळवला. तर चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सने पराभव झाला आहे. हैदराबादच्या विजयात ईक्षण किशन आणि अनिकेत वर्मा यांची महटवची भूमिका बजावली.
प्रथम हैद्राबादच्या संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने रथम फलंदाजी करताना 153 धावा केल्या. हैदराबादने 154 धावांचा यशस्वी पाठलाग करत चेन्नईवर विजय मिळवला आहे. ट्रॅव्हस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरी क्लासेन यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र इशान किशनने एका बाजूने आपली खेळी सुरू ठेवली आणि हैदराबादच्या संघाला विजय मिळवून दिला. अनिकेत वर्माने त्याला चांगली साथ दिली.
सनरायजर्स हैदराबाद आतापर्यंत 9 सामने खेळली असून त्यांचा आजकहा विजय हा 3 रा विजय होता. सध्या हैदराबादचा संघ 8 व्या स्थानावर आहे. त्यांच्या प्ले-ऑफच्या अशा अजूनही जिवंत आहेत. मात्र उर्वरित पाच सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागणार आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. चेन्नईला 9 सामन्यात केवळ 2 च विजय प्राप्त झाले आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानी आहेत. उर्वरित 5 सामन्यात विजय मिळाला तरी इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज : शेख रशीद, रचिन रवींद्र/वंश बेदी, आयुष म्हात्रे, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, विजय शंकर/सॅम कुरन, जेमी ओव्हरटन, एमएस धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथिराना.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, इशान मलिंगा.