फोटो सौजन्य - X
इंडीयन प्रिमियर लीग 2025 तिकिटांची माहिती : इंडीयन प्रिमियर लीग 2025 ची ही स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये खेळणारे चार संघ ठरले आहेत. राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्लेऑफचे सामने खेळणार आहेत. प्लेऑफच्या सामन्याआधी आणखी 6 सामने अजुनही शिल्लक आहेत आता आयपीएलच्या सोशल मिडीयावर बीसीसीआयने प्लेऑफच्या तिकीटांची माहिती दिली आहे, त्याचबरोबर केव्हा तिकीटे खरेदी करता येणार आहेत यांदर्भात सविस्तर वाचा.
बीसीसीआयने शेअर केलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की आयपीएल 2025 च्या प्लेयर्सच्या सामन्यांची तिकिटे ही 24 मे पासून सुरू होणार आहेत. त्याचबरोबर या तिकिटांची खरेदी क्रिकेट चाहते हे आयपीएलच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट झोमॅटो वेबसाईटवर देखील खरेदी करू शकतात.
आयपीएल वेबसाईट
डिस्ट्रिक्ट झोमॅटो वेबसाईट
काल गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना पार पडला या सामन्यात गुजरातच्या संघाला या सीजनमध्ये चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गुजरातच्या संघाने प्ले ऑफ मध्ये स्थान पक्के केले आहे पण सध्या संघ हा पहिल्या स्थानासाठी लढत आहे.
#TATAIPL 2025 Playoffs tickets to go LIVE on 24th May 🎟 The tickets can be purchased from the official IPL website – https://t.co/RuvsIO4v1J and also on the District by Zomato Website – https://t.co/XPebz2z206 and the District by Zomato App. Details ▶️ https://t.co/r7E47Az8MZ pic.twitter.com/eJn81mgvqr — IndianPremierLeague (@IPL) May 23, 2025
आयपीएल 2025 च्या गुणतालिकेवर नजर टाकली तर सध्या पहिल्या स्थानावर गुजरातचा संघ आहे गुजरातचे आत्तापर्यंत 13 सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी नऊ सामन्यात विजय मिळवून 18 गुण त्यांच्या खात्यात जमा आहेत. दुसरा स्थानावर बंगळूरु चा संघ आहे त्यांचा आतापर्यंत 12 सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी आठ सामन्यात विजय मिळवला आहे आणि 17 गुणांसह ते सध्या दुसऱ्या स्थानावर आहेत. तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्सचा संघ आहे पंजाबचा आतापर्यंत बारा सामने झाले आहेत आणि यामधील त्यांनी आठ सामन्यात विजय मिळवला आहे आणि तीन सामना त्यांचा पराभव झाला आहे एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
श्रीलंकेचा दिग्गज Angelo Mathews ने केला कसोटी क्रिकेटला अलविदा!
मुंबई इंडियन्स संघ चौथ्या स्थानावर आहे संघाचे आतापर्यंत 13 सामने झाले आहेत यामधील त्यांना आठ सामन्यात विजय मिळाला आहे तर पाच सामना त्यांचा पराभव झाला आहे 16 गुणांसह संघ चौथ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, कोलकत्ता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स हे संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.