IPL 2025: Shreyas Iyer, who has proven himself, is more aggressive this season, with a strike rate of 170 and 3 half-centuries in 6 matches.
IPL २०२५ : आयपीएल २०२५ च्या १८ हंगाम चांगलाच रंगात आला आहे. आतापर्यंत ३२ सामने खेळवण्यात आले आहेत. या हंगामात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर आपल्या फलंदाजीने सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे. २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून देणारा श्रेयस अय्यर या हंगामात पंजाब किंग्जचा कर्णधार आहे. पंतनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत महागडा खेळाडू म्हणून पीबीकेएसने त्याला २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले.
पंतच्या तुलनेत, अय्यरने पहिल्या ६ सामन्यांमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीने आणि यशस्वी नेतृत्वाने स्वतःचे मूल्य सिद्ध केले. त्याने संघाला ४ सामने जिंकण्यास मदत केली असताना, त्याने १७०च्या प्रभावी स्ट्राईक रेटसह तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २५० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये नाबाद ९७ धावांची धमाकेदार खेळी समाविष्ट आहे.
हेही वाचा : MI vs SRH : मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज बुमराह कमाल करणार? सनरायझर्स हैदराबादविरुद्ध उतरणार मैदानात..
हेही वाचा : DC Vs RR: आयपीएलच्या १८ व्या हंगामात रंगला पहिल्या सुपरओव्हरचा थरार; दिल्लीचा ‘सुपरहिट’ विजय
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये काल थरारक सामना पार पडला. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना झाला, हा सामान सुपर ओव्हरमध्ये गेला आणि या सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने विजय मिळवून स्पर्धेचा पाचवा विजय नावावर केला आहे. प्रथम फलंदाजी करत दिल्लीने १८८ धावा केल्या होत्या तर प्रतिउत्तरात राजस्थानने देखील १८८ धावा केल्या आणि सामाना टाय झाला आणि सुपर ओव्हर घेण्यात आली. त्यामध्ये दिल्लीने बाजी मारली.