फोटो सौजन्य - Chennai Super Kings/KolkataKnightRiders
KKR vs CSK Dream Team : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या रोमांचक विजयासह, केकेआरने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. गतविजेत्या संघाचा पुढील सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. शेवटच्या सामन्यात, आंद्रे रसेल या सिझनमध्ये पहिल्यांदाच फॉर्ममध्ये दिसला. रसेलने २५ चेंडूत ५७ धावांची तुफानी खेळी केली. त्याच वेळी, अंगकृष रघुवंशी देखील उत्कृष्ट लयीत पाहायला मिळाला. गोलंदाजीत हर्षित राणा तसेच वरुण चक्रवर्तीच्या फिरकी गोलंदाजीची जादू शिगेला पोहोचली होती. दुसरीकडे, सीएसके आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत, धोनीची सेना केकेआरचा खेळ खराब करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. ड्रिम टीम संघात तुम्हाला पैसे कमावून देणारे ते अकरा खेळाडू कोण असतील हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आम्ही रहमानुल्ला गुरबाजला आमच्या संघामध्ये विकेटकिपर म्हणून सामील केले आहे. राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात गुरबाजने शानदार फलंदाजी केली आणि २५ चेंडूत ३५ धावांची शानदार खेळी केली. गुरबाजकडे त्याच्या स्फोटक फलंदाजीने कोणत्याही सामन्याचा मार्ग बदलण्याची ताकद आहे. तुम्ही ग्रँड लीगमध्ये गुरबाजला कर्णधार देखील बनवू शकता.
𝐄𝐕𝐄𝐑𝐘𝐓𝐇𝐈𝐍𝐆 𝐀𝐓 𝐒𝐓𝐀𝐊𝐄 𝐅𝐎𝐑 𝐊𝐊𝐑! 🤯
KKR have kick-started their playoff push with a win over RR, will they extend their streak, or will CSK stand in their way as a roadblock, 𝘼𝙨𝙡𝙞 𝙍𝘼𝘾𝙀 𝙖𝙗 𝙨𝙝𝙪𝙧𝙪!💥#IPLonJioStar 👉 #KKRvCSK| WED, 7th MAY, 6:30… pic.twitter.com/mlcWqc8hp9
— Star Sports (@StarSportsIndia) May 6, 2025
अजिंक्य रहाणे हा केकेआरच्या फलंदाजांपैकी एक आहे जो काही प्रमाणात फॉर्ममध्ये दिसला आहे. १७ वर्षीय आयुष म्हात्रेने त्याच्या फलंदाजीने खूप प्रभावित केले आहे. म्हात्रे यांनी आरसीबीविरुद्ध फलंदाजीने धुमाकूळ घातला होता आणि ४८ चेंडूत ९४ धावांची धमाकेदार खेळी केली होती. आम्ही आमच्या संघात तिसरा फलंदाज म्हणून डेवाल्ड ब्रेव्हिसचा समावेश केला आहे.
गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावून आंद्रे रसेल फॉर्ममध्ये परतला आहे. सुनील नरेनच्या फिरकीच्या जादूने चमत्कार घडवले आहेत. यासोबतच तो फलंदाजीमध्येही महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. रवींद्र जडेजाने आरसीबीविरुद्ध ४५ चेंडूत ७७ धावांची शानदार खेळी खेळली होती. जर सॅम करन तिसऱ्या क्रमांकावर खेळला तर तो तुम्हाला चांगले गुण मिळवून देऊ शकतो.
राजस्थानविरुद्ध वरुण चक्रवर्तीच्या फिरकी चेंडूंची जादू शिगेला पोहोचली होती. वरुणने एकाच षटकात २ विकेट्स घेतल्या. या सिझनमध्ये हर्षित राणाही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नूर अहमद हा आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
KKR vs CSK ड्रीम टीम
यष्टिरक्षक- रहमानउल्ला गुरबाज
फलंदाज- अजिंक्य रहाणे, आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेव्हिस
अष्टपैलू- आंद्रे रसेल, सुनील नरेन (कर्णधार), रवींद्र जडेजा, सॅम कुरन (उपकर्णधार)
गोलंदाज- वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, नूर अहमद