Joe Root breaks Ponting world record
बुद्धिबळाच्या पटावर R Praggnanandhaa चा डंका! Grand Chess Tour जिंकणारा पहिला भारतीय
लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जेव्हा जो रूट फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा त्याच्याकडे एक मोठा विक्रम मोडण्याची संधी होती. त्याला रिकी पाँटिंगला मागे टाकण्यासाठी फक्त नऊ धावांची गरज होती. रुटने ९ धावा करताच हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. जो रूटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. रूटने इंग्लंडमध्ये ८९ सामन्यांतील १५६ डावांमध्ये ७,५९४ धावा केल्या आहेत .यामध्ये २४ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियात ९२ कसोटी सामन्यांतील १५४ डावांमध्ये ७,५७८ धावा केल्या आहेत.
पाकिसत्नाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रुटची बॅट चालली नाही. त्याने १३ चेंडूमध्ये फक्त ४धावा केल्या. मोहम्मद अब्बासने त्याला एलबीडबल्यू केले. दुसऱ्या डावात रुट मोठी खेळी करेल अशी अपेक्षी होती परंतु तो ३७ चेंडूवर २४ धावा करुन पव्हेलियमनध्ये परतला.






