Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका! ‘या’ धुरंधर खेळाडूला पहिल्या सामन्याला मुकावे लागणार 

या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बाहेर पडला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 02, 2026 | 05:41 PM
T20 World Cup 2026: A major blow for Australia before the T20 World Cup! This star player will miss the first match.

T20 World Cup 2026: A major blow for Australia before the T20 World Cup! This star player will miss the first match.

Follow Us
Close
Follow Us:

Josh Hazlewood is out of the first match of the T20 World Cup : ७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. पॅट कमिन्सला दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. आता, संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडल देखील टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे. तो संघासोबत श्रीलंकेला जाणार नसल्याची बातमी समोर आली आहे.

हेही वाचा : IND vs PAK, T20 World Cup 2026: “हा आमचा निर्णय….” भारताविरुद्धच्या बहिष्कारावर पाक कर्णधाराने केला मोठा खुलासा

राष्ट्रीय निवडकर्ता टोनी डोडमेड यांनी सोमवारी जाहीर केले की, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी संघासोबत श्रीलंकेला जाणार नाही. हेझलवूड सध्या त्याची पुनर्प्राप्ती प्रक्रिया पूर्ण करत असल्याचे त्यांनी सांगितले. डोडमेडच्या मते, नॅथन एलिस, टिम डेव्हिड आणि ग्लेन मॅक्सवेल कोलंबोमध्ये दाखल जाहले आहेत आणि मंगळवारी ऑस्ट्रेलियन संघात सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया ११ फेब्रुवारीपासून कोलंबो आणि पलेकेले येथे आयर्लंडविरुद्ध त्यांचे सुरुवातीचे चार गट सामने खेळणार आहे. गट टप्प्यातील त्यांचे इतर प्रतिस्पर्धी ओमान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.

शॉन अ‍ॅबॉटचा राखीव खेळाडू

जोश हेझलवुड ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यादरम्यान सिडनीमध्येच राहणार आहे. जेणेकरून त्याला परिचित वातावरणात खेळण्यासाठी परतण्याचा कार्यक्रम सुरू ठेवण्यास मदत होईल. त्याच्या अनुपस्थितीत, अनुभवी वेगवान गोलंदाज शॉन अ‍ॅबॉटचा संघात प्रवासी राखीव खेळाडू म्हणून समावेश केला गेला आहे.

डोडमेड पुढे म्हणाले की, “नाथन, टिम आणि ग्लेन कोलंबोला आले असून पाकिस्तान दौऱ्यानंतर आमच्यासोबत सामील होणार आहेत.  श्रीलंकेला जाण्यापूर्वी जोशने घरीच त्याची प्रकृती सुधारणे अधिक व्यावहारिक ठरेल असे आम्हाला वाटले.”

हेझलवुड अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर

एक गोष्ट लक्ष्यात घेण्यासारखी आहे, की हॅझलवुडला यापूर्वी हॅमस्ट्रिंग स्ट्रेनमधून बरे होताना अ‍ॅकिलीसच्या समस्येला सामोरे जावे लागले होते.  ज्यामुळे तो २०२५-२६ अ‍ॅशेस मालिकेतून देखील बाहेर पडला होता. निवड समितीने अद्याप याबाबत स्पष्ट केलेले नाही की हेझलवुड स्पर्धेच्या कोणत्या टप्प्यावर उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : IND19 vs PAK19: सरफराज अहमदकडून चालू सामन्यात चिटिंग! डगआउटमध्ये बसुन खुलेआम वापरला फोन; पडली वादाची ठिणगी

दुखापतींतून सावरणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू

कर्णधार पॅट कमिन्सला सततच्या पाठीच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्याने ऑस्ट्रेलियाला आधीच मोठा झटका बसला आहे.   त्याच्या जागी बेन द्वारशुइसचा १५ जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. डोडमीड म्हणाले की, शॉन अ‍ॅबॉटची नॅथन एलिसचा बॅकअप म्हणून निवड करण्यात आली आहे.

Web Title: Josh hazlewood has been ruled out of the first match of the t20 world cup due to injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 05:41 PM

Topics:  

  • Josh Hazlewood
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

IND vs PAK, T20 World Cup 2026: “हा आमचा निर्णय….” भारताविरुद्धच्या बहिष्कारावर पाक कर्णधाराने केला मोठा खुलासा 
1

IND vs PAK, T20 World Cup 2026: “हा आमचा निर्णय….” भारताविरुद्धच्या बहिष्कारावर पाक कर्णधाराने केला मोठा खुलासा 

T20 World Cup 2026 आधी श्रीलंकेला घरच्या मैदानावर इंग्लडसमोर टेकावे लागले गुडघे! मालिका गमावली अन्…
2

T20 World Cup 2026 आधी श्रीलंकेला घरच्या मैदानावर इंग्लडसमोर टेकावे लागले गुडघे! मालिका गमावली अन्…

T20 World Cup 2026: न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारतासाठी ठरली रंगीत तालीम! T20 World Cup पूर्वी फॉर्ममध्ये परतले ‘हे’ खेळाडू
3

T20 World Cup 2026: न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारतासाठी ठरली रंगीत तालीम! T20 World Cup पूर्वी फॉर्ममध्ये परतले ‘हे’ खेळाडू

T20 World Cup 2026 मधील सराव सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा, या खेळाडूकडे असणार संघाची कमान!
4

T20 World Cup 2026 मधील सराव सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा, या खेळाडूकडे असणार संघाची कमान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.