Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Archery World Cup 2025 : भारताच्या ज्योतीने रचला इतिहास! विश्वचषक अंतिम फेरीत मिळवला ऐतिहासिक विजय

भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमने शनिवारी विश्वचषक अंतिम फेरीत पदक जिंकून इतिहास रचला आहे. ज्योतीने विश्वचषक अंतिम फेरीत विजय मिळवणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज ठरली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 18, 2025 | 03:04 PM
Archery World Cup 2025: India's Jyoti creates history! Historic victory in the World Cup final

Archery World Cup 2025: India's Jyoti creates history! Historic victory in the World Cup final

Follow Us
Close
Follow Us:
  • वितिरंदाजी विश्वचषकात ज्योती सुरेखा वेन्नमने रचला इतिहास 
  • विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ज्योतीचा दिमाखदार विजय 
  • अंतिम फेरीत ज्योतीने दुसऱ्या मानांकित एला गिब्सनचा केला पराभव 

Archery World Cup 2025 Jyoti creates history : भारतीय तिरंदाज ज्योती सुरेखा वेन्नमने शनिवारी इतिहास रचला आहे. ज्योतीने विश्वचषक अंतिम फेरीत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज बनली आहे. तिसऱ्या मानांकित ज्योतीने दमदार कामगिरी करत दुसऱ्या मानांकित एला गिब्सनला १५०-१४५ अशी धूळ चारली आहे. ज्योतीने सर्व १५ बाणांवर १०-१० असा दिमाखादार विजय मिळवला आहे.

हेही वाचा : Ranji Trophy 2025 : रिंकू सिंगने झळकावले शतक! उत्तर प्रदेशला संकटातून काढले बाहेर, वाचा सविस्तर

आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेती ठरलेली ज्योती सुरेखा वेन्नमची विश्वचषकाच्या मोहिमेची सुरुवात क्वार्टरफायनलमध्ये अॅलेक्सिस रुईझवर १४३-१४० असा विजय मिळवून झाली होती, परंतु उपांत्य फेरीत तिला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मेक्सिकोच्या आंद्रिया बेसेराविरुद्ध १४३-१४५ असा पराभव स्वीकारावा लागला होता.

कांस्यपदकाच्या सामन्यामध्ये, ज्योतीने उल्लेखनीय पुनरागमन करत सलग १५ वेळा १०-१० लक्ष्य गाठले आणि गिब्सनवर वर्चस्व गाजवले. सध्या महिलांच्या कंपाऊंड प्रकारात तिसऱ्या क्रमांकावर विराजमान असलेली ज्योती तिच्या जागतिक क्रमवारीच्या आधारे नानजिंगमधील वैयक्तिक स्पर्धेसाठी देखील आता पात्र ठरली आहे.

विश्वचषक फायनलमध्ये ज्योतीचा हा तिसरा सहभाग ठरला. तिने यापूर्वी त्लाक्सकाला (२०२२) आणि हर्मोसिलो (२०२३) येथे भाग स्पर्धेत घेतला होता आहे. महिलांच्या कंपाऊंड प्रकारामधील आणखी एक भारतीय तिरंदाज मधुरा धामणगावकरला पहिल्या फेरीत मेक्सिकोच्या मारियाना बर्नालकडून १४२-१४५ असा पराभव पदरी पडला आणि तीला  विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले.

या वर्षी ऑबर्नडेल येथे कंपाऊंड मिश्र संघाचे विजेतेपद आपल्या नावावर करणारा  ऋषभ यादव आता पुरुषांच्या कंपाऊंड स्पर्धेत भाग घेणार आहे. त्याचा सामना उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या किम जोंगहोसोबत होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑबर्नडेल येथे कंपाऊंड मिश्र संघाचे विजेतेपद जिंकणारा ऋषभ यादव आणि ज्योती यांनी त्यांच्या क्रमवारीच्या आधारे नानजिंगमधील वैयक्तिक स्पर्धांसाठी पात्रता मिळवण्यात यश प्राप्त केले आहे.

हेही वाचा : IND vs AUS ODI: कपिल देव आणि मोहम्मद शमी यांची दहशत! ऑस्ट्रेलियन फलंदाजांना भरली होती धास्ती; वाचा सविस्तर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार लढाई

भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यां दोन संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे १९ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सज्ज झाला आहे.

Web Title: Jyoti surekha vennam creates history by winning the final of archery world cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 03:04 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.