फोटो सौजन्य - एक्स
कॅरिबियन प्रीमियर लीग सध्या सुरु आहे, यामध्ये अनेक वेस्ट इंडिजचे दमदार खेळाडू त्याचबरोबर जगभरामधील खेळाडू सामील झाले आहेत. रविवारी २४ ऑगस्ट रोजी कॅरिबियन प्रीमियर लीग २०२५ (CPL 2025) च्या १० व्या सामन्यात, शाहरुख खानच्या संघ ट्रायव्हॅगो नाईट रायडर्सने प्रीती झिंटाच्या संघ सेंट लुसिया किंग्जचा १८ धावांनी पराभव केला. माजी कर्णधार किरॉन पोलार्ड ट्रायव्हॅगो नाईट रायडर्सच्या विजयाचा नायक होता. त्याने २२४ च्या स्ट्राईक रेटने ६५ धावा केल्या आणि संघाला १८३ धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. प्रत्युत्तरादाखल, सेंट लुसिया किंग्ज फक्त १६५ धावाच करू शकले.
ट्रायव्हॅगो नाईट रायडर्सकडून किरॉन पोलार्डने २९ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांसह ६५ धावा केल्या. कॉलिन मुनरोने ३० चेंडूत ४३ धावा केल्या. कर्णधार निकोलस पूरनने ३४ धावा केल्या, पण ३० चेंडू खेळले. अॅलेक्स हेल्सने १०, केसी कार्टीने ९, आंद्रे रसेलने १ आणि अकील हुसेनने २ धावा केल्या. मॅकेन्झी क्लार्कने नाबाद १२ धावा केल्या. सेंट लुसिया किंग्जकडून केऑन गॅस्टनने २ बळी घेतले. ओशेन थॉमस, डेव्हिड वीस, रोस्टन चेस आणि तबरेज शम्सी यांनी १-१ बळी घेतला.
The mighty Pollard is back! 💥
At 38, the Caribbean powerhouse is still winning games for Trinbago Knight Riders! 🔥#KieronPollard #TKRvSLK #CPL2025 #Sportskeeda pic.twitter.com/60ockAoID3
— Sportskeeda (@Sportskeeda) August 24, 2025
सेंट लुसिया किंग्जकडून जॉन्सन चार्ल्सने सर्वाधिक ४७ धावा केल्या. टिम सेफर्टने ३५ धावा केल्या. डेलानो पॉटगीटरने २४ धावा केल्या. रस्टन चाडने १२ धावा केल्या. टिम डेव्हिडने १० आणि डेव्हिड वीसने १० धावा केल्या. अकीम ऑगस्टे ९ चेंडूत २० धावा करून नाबाद राहिले आणि केऑन गॅस्टनने १ धाव केली. ट्रायव्हॅगो नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेल आणि उस्मान तारिकने १-१ बळी घेतले. मोहम्मद आमिर आणि अकील हुसेनने १-१ बळी घेतला.
या विजयासह, ट्रायव्हॅगो नाईट रायडर्स पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांचे ३ सामन्यात २ विजयांसह ४ गुण आहेत. सेंट लुसिया किंग्ज पाचव्या स्थानावर आहे. त्यांचे ३ सामन्यात १ विजय आणि १ पाऊस पडलेल्या सामन्यासह ३ गुण आहेत. अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स पहिल्या स्थानावर आहेत. त्यांचे ५ सामन्यात ५ गुण आहेत. बार्बाडोस रॉयल्स २ पैकी २ सामन्यात पराभव पत्करून शेवटच्या स्थानावर आहे.