Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hong Kong Open Super 500 मध्ये भारतीय खेळाडूंचा डंका! लक्ष्य सेन आणि सात्विक-चिराग जोडीची अंतिम फेरीत धडक! 

हाँगकाँग ओपन सुपर ५०० स्पर्धेमध्ये लक्ष्य सेनने चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन चेनला तर रंकीरेड्डी- शेट्टी जोडीने चिनी तैपेईच्या बिंग-वेई लिन आणि चेन चेंग कुआन यांचा पराभव करून अंतिम फेरीतप्रवेश केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 13, 2025 | 08:34 PM
Indian players stunned in Hong Kong Open Super 500! Lakshya Sen and Satwik-Chirag pair enter finals!

Indian players stunned in Hong Kong Open Super 500! Lakshya Sen and Satwik-Chirag pair enter finals!

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताच्या खेळाडूंनी हाँगकाँग ओपन स्पर्धेत शानदार कामगिरी 
  • लक्ष्य सेनसह सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी अंतिम फेरीत 
  • हाँगकाँग ओपन सुपर ५०० स्पर्धेचा थरार कायम 

Hong Kong Open Badminton Tournament : भारताच्या खेळाडूंनी हाँगकाँग ओपन स्पर्धेत आपला डंका वाजवला आहे. भारतीय खेळाडू लक्ष्य सेनसह सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या स्टार पुरुष जोडीने शनिवारी सरळ गेममध्ये विजय मिळवत हाँगकाँग ओपन सुपर ५०० च्या अंतिम फेरीत पदिमाखात प्रवेश केला आहे.

हेही वाचा : Asia cup 2025 : तो शाहिद आफ्रिदी, विष ओकणारच! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी ‘हा’ Video पाहून तुमचे रक्त खवळेल

२०२१ वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता २३ वर्षीय लक्ष्यने जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चाऊ टिएन चेनला  २३-२१, २२-२० असे पराभूत केले. लक्ष्य सेनने शेवटचा जुलै २०२३ मध्ये कॅनडा ओपन सुपर ५०० स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीमध्ये सध्या २० व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्यचा सामाना चीनच्या दुसऱ्या मानांकित ली शी फेंगशी होणार आहे.

जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकाच्या सात्विक आणि चिराग या जोडीने चिनी तैपेईच्या बिंग-वेई लिन आणि चेन चेंग कुआन यांचा २१-१७, २१-१५ असा दणदणीत पराभव केला. या विजयासह या भारतीय जोडीने या हंगामात सहा उपांत्य सामने गमावल्यानंतर पहिल्यांदा अंतिम सामना गाठला आहे.  आता अंतिम सामन्यात आठव्या मानांकित भारतीय जोडीचा सामना चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग आणि चिनी तैपेईच्या फांग-चिह ली आणि फांग-जेन ली यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीत विजय मिळवणाऱ्या विजय मिळवणाऱ्या जोडीशी होणार आहे.

पहिल्या गेममध्ये दोन्ही जोड्या ३-३ आणि ६-६ अशा बरोबरीत राहिल्या होत्या. पण सात्विकच्या स्मॅश आणि चिरागच्या जलद ‘इंटरसेप्शन’मुळे या भारतीय जोडीने ११-८ अशी आघाडी मिळवली होती. यानंतर तैवानच्या जोडीकडून  चांगले पुनरागमन करण्यात आले आणि स्कोअर १२-१२ असा बरोबरीत आणला. मात्र तरी देखील भारतीय जोडीने १५-१२ अशी आघाडी मिळवली. चिरागच्या जलद पुनरागमनामुळे भारतीय जोडीने दुसऱ्या गेम पॉइंटवर गेम जिंकला. पुढच्या गेममध्ये चेन आणि लिन यांनी चांगली सुरुवात केली आणि ४-२ अशी आघाडी मिळवण्यात यश मिळवले परंतु भारताने ६-६ अशी बरोबरी साधून कमाल केली.

हेही वाचा : SA vs ENG T20 : फिल साल्टने स्वतःच्याच विक्रमाला दिला तडा! इंग्लंडकडून T20 cricket मध्ये पहिल्यांदाच गाजवला ‘हा’ पराक्रम

चिरागच्या काही चुकां भारताला भोवल्या. त्यामुळे तैवानच्या जोडीकडून  १०-८ अशी आघाडी घेण्यात आली. भारतीय जोडी संकटात आली. पण सात्विकने आणखी एक जलद स्मॅश मारून  स्कोअर १२-१२ असा बरोबरीत आणण्यात यश मिळवले. त्यानंतर भारतीय जोडीने सामन्यावर आपली पकड अधिक मजबूत करत स्कोअर १७-१५ असा केला. त्यानंतर लवकरच स्कोअर १९-१५ असा पुढे सरकला झाला आणि चेनच्या एका चुकीमुळे सात्विक आणि चिराग जोडीला पाच मॅच पॉइंट मिळाले आणि भारताचा विजय निश्चित झाला.

Web Title: Lakshya sen and satwik chirag pair advance to the final of hong kong open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • Chirag Shetty
  • lakshya sen
  • Satwiksairaj Rankireddy

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.