फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Lucknow Super Joints vs Chennai Super Kings Toss Update : आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये महा मुकाबला होणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा या स्पर्धेमध्ये सलग चौथ्या विजयाच्या शोधात आज मैदानात उतरेल तर चेन्नई सुपर किंग्सला मागील पाच सामन्यांमध्ये सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे त्यामुळे ते सध्या दुसऱ्या विजयाच्या शोधात आज मैदानात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात उतरतील. आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या हंगामात, चेन्नई संघाने आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे आणि पॉइंट टेबलमध्ये ते 10 व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, लखनौ संघ ६ पैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये ५ सामने झाले आहेत ज्यात लखनौ संघाने ३ सामने जिंकले आहेत तर चेन्नई संघाने फक्त एक सामना जिंकला आहे आणि एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
🚨 Toss 🚨@ChennaiIPL elected to field against @LucknowIPL
Updates ▶️ https://t.co/jHrifBkT14 #TATAIPL | #LSGvCSK pic.twitter.com/5V7bYuXMQ8
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2025
या सामन्यासाठी त्याच्या संघात दोन बदल करण्यात आल्याचे कर्णधार धोनीने सांगितले. जेमी ओव्हरटन आणि शेख रशीद यांना प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, तर अश्विन आणि डेव्हिन कॉनवे यांना वगळण्यात आले आहे. दरम्यान, लखनौचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की मिचेल मार्श संघात परतला आहे. तो गेल्या सामन्यात खेळला नव्हता आणि यावेळी तो हिम्मत सिंगच्या जागी संघात आला आहे.
Can you guess the joke here? 😉
We are getting started in Lucknow with a ‘😁’
Updates ▶ https://t.co/jHrifBkT14 #TATAIPL | #LSGvCSK | @LucknowIPL | @ChennaiIPL pic.twitter.com/a9CGMOSOUg
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2025
एमआस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, रवींद्र जडेजा, जेमी ओवटर्न, अंशुल कम्बोज, नूर अहमद, खलील अहमद, मॅथिश पथीराणा
या विदेशी खेळाडूने लावला 9 कोटींचा चुना! 5 सामन्यात फक्त 46 धावा, काय करणार कर्णधार अक्षर पटेल?
रिषभ पंत (कर्णधार आणि विकेटकिपर), एडन मारक्रम, मिचेल मार्श, निकोलस पुरण, डेव्हिड मिलर, आयुष्य बडोनी, अब्दुल समद, शार्दूल ठाकूर, दिग्वेश राठी, आकाशदीप, आवेश खान