लखनऊ : आज आयपीएलच्या १६ व्या हंगामातील २१ सामना आज वाजपेयी एकना स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सुरु आहे. लखनऊ सुपर जायंट्सला होम ग्राऊंडवर पराभूत करणे कठीण आहे. याआधी घरच्या मैदानावर एकना स्टेडियमवर खेळले गेलेले दोन्ही सामने लखनऊ सुपर जायंट्सने जिंकले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सने या मोसमात खेळल्या गेलेल्या चारपैकी तीन सामने जिंकले असून, गुणतालिकेत दुसरे स्थान कायम राखले आहे. त्याचा एकमेव पराभव चेन्नई सुपर किंग्जकडून झाला. त्यामुळे पंजाब किंग्ज काय करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पंजाब किंग्ज दोन वेळा पराभूत :
त्याचबरोबर या मोसमात सलग दोन सामने जिंकल्यानंतर पंजाब किंग्जच्या संघाने दोन सामन्यांत पराभवाची चव चाखली आहे. कोलकाता आणि राजस्थानविरुद्ध सलग दोन सामने जिंकणाऱ्या शिखर धवनच्या संघाची मधली फळी ढासळत चालली आहे. त्यामुळे त्यांना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.