फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings 1st innings report : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात पहिले फलंदाजी करत लखनऊ सुपर जेन्ट्स ने चेन्नई सुपर किंग समोर 167 गावांचे लक्ष्य उभे केले आहे. यामध्ये लखनऊचे पहिले तीन दमदार फलंदाज मोठी कामगिरी करण्यात आज चेन्नईच्या गोलंदाजांसमोर फेल ठरले.
लखनऊ सुपर जायंट्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर एडन मार्क्ररमने संघासाठी सहा चेंडू खेळल्याने यामध्ये हा धासवा केल्या. तर मिचेल मार्शने २५ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. आयपीएल २०२५ मधील ऑरेंज कॅप होल्डर निकोलस पुरण या सामन्यात मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्यांनी या सामन्यात नऊ चेंडू खेळले त्यानंतर अंशुल कंबोज याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. या सामन्यामध्ये आयुष बडोनी याने १७ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर आज रवींद्र जडेजाची फिरकीच जादू आज लखनऊच्या मैदानावर दिसली. त्याने आज तीन ओव्हर टाकल्या आणि यामध्ये त्याने दोन विकेट्स घेतले. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्स यशस्वी वेगवान गोलंदाज खलील अहमद याने आज संघासाठी एक विकेट घेतला, तर अंशुल कंबोज याने सुद्धा एक विकेटची कमाई केली. पर्पल कॅप होल्डर नूर अहमद याने आज मजबूत गोलंदाजी केलीत त्याने चार ओव्हरमध्ये तेरा धावा दिल्या पण त्याच्या हाती एकही विकेट लागली नाही. मथीशा पाथिराणा याच्या हाती देखील दोन विकेट लागले पण तो आज जास्त महाग ठरला.