फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मनु भाकर मेडल्स : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली होती परंतु भारताच्या हाती सहा मेडल हाती लागले होते. यामध्ये भारताच्या शूटर्सने कमालीची कामगिरी केली होती. भारताला पॅरिसमध्ये ३ मेडल मिळाले होते यामध्ये मनू भाकर हिने वैयक्तिक शूटिंग स्पर्धेत कांस्यपदक नावावर केलं होते तर मिक्स टीममध्ये सुद्धा कांस्यपदक मिळवले होते. त्याचबरोबर रायफल शूटिंगमध्ये सुद्धा भारताच्या हाती कांस्यपदक मिळवले होते. यामध्ये मनु भाकर हिने भारतासाठी दोन पदक मिळवून इतिहास रचला होता.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून देशाला गौरव मिळवून देणारी आणि इतिहास रचणारी नेमबाज मनू भाकर खूपच नाराज आहे. गेल्या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या स्टारने देशासाठी २ कांस्यपदके जिंकली होती. ही पदके अवघ्या ५ महिन्यांत खराब झाली. पॅरिसमध्ये जिंकलेल्या दोन कांस्यपदकांच्या जागी मनूला नवीन पदके मिळण्याची शक्यता आहे कारण तो त्या खेळाडूंमध्ये आहे ज्यांनी आपल्या पदकांचे नुकसान झाल्याची तक्रार केली आहे.
अलिकडच्या काळात जगभरातील अनेक खेळाडूंनी त्यांच्या रंग उडालेल्या पदकांची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. भाकरच्या पदकांचा रंग ‘विरंगुळा’ होता आणि त्यांची स्थिती खराब असल्याचे आढळून आले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) सांगितले की, खराब झालेले मेडल्स पद्धतशीरपणे मोनाई डी पॅरिस (फ्रान्सची नॅशनल मिंट) द्वारे बदलले जाणार आहेत. खेळाडूंना देण्यात येणारे नवे पदक जुनेच असणार आहे असे सांगण्यात आले आहे.
प्रत्येक ऑलिम्पिक पदकाच्या मध्यभागी असलेल्या लोखंडाच्या तुकड्यांचे वजन १८ ग्रॅम असते. मोनाई डी पॅरिस फ्रान्ससाठी नाणी आणि इतर चलने तयार करते. पॅरिस ऑलिम्पिकची आयोजन समिती सर्व खराब झालेले पदक बदलण्यासाठी मोनाई डी पॅरिससोबत काम करत आहे. पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक २०२४ मध्ये देण्यात आलेल्या पदकांमध्ये आयकॉनिक आयफेल टॉवरच्या तुकड्यांचा समावेश होता.
Vinod Kambli ची अवस्था पाहून चाहते भावुक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पॅरिस २०२४ साठी ५,०८४ सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके उच्च दर्जाचे दागिने आणि घड्याळ निर्माता Chaumet (LVMH गटाचा भाग) द्वारे डिझाइन केली गेली होती आणि मोनेई डी पॅरिसने तयार केली होती. ऑलिम्पिकच्या एकाच सत्रात दोन पदके जिंकणारा मनू हा स्वातंत्र्यानंतरचा पहिली भारतीय आहे. तिने वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकून या खेळांमध्ये भारताचे पदकाचे खाते उघडले. ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती देशातील पहिली महिला नेमबाज ठरली. यानंतर या २२ वर्षीय खेळाडूने सरबज्योत सिंगसह १० मीटर एअर पिस्तूल मिश्र संघात कांस्यपदक जिंकले आहे आणि इतिहास रचला आहे.