फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध आयर्लंड एकदिवसीय तिसरा सामना : भारत विरुद्ध आयर्लंड महिला संघाची सध्या एकदिवसीय मालिका सुरु आहे. यामध्ये दोन्ही संघामधील आज मालिकेचा शेवटचा सामना सुरु झाला आहे. या मालिकेमध्ये दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून भारताच्या महिला संघाने मालिका नावावर केली आहे. सध्या सुरु असलेल्या सामन्यांमध्ये भारताची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारताच्या दोन्ही फलंदाजांनी कमालीची सुरुवात टीम इंडियाला करून दिली आहे. यामध्ये भारताची कर्णधार स्मृती मानधना हिने तिचे अर्धशतक पूर्ण केले आहे. तर प्रतिका रावल सुद्धा संघासाठी मैदानात उभी आहे.
स्मृती मानधना हिने संघासाठी ३९ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या आहेत. तर प्रतिका रावल हिने ४२ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या आहेत. भारताच्या संघाने शेवटच्या सामन्यांमध्ये एकही विकेट न गमावता दोन्ही फलंदाज विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. त्याचबरोबर भारताच्या संघ आजच्या सामन्यात तीनही सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिका एकतर्फी जिंकण्याच्या इराद्यात आहेत.
A familiar sight! 🙌
Back to Back FIFTIES for Skipper Smriti Mandhana 👏👏
Updates ▶️ https://t.co/xOe6thhPiL#TeamIndia | #INDvIRE | @IDFCFIRSTBank | @mandhana_smriti pic.twitter.com/Xsec3RNfuL
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
भारतीय संघाचे दोन्ही फलंदाज कर्णधार स्मृती मानधना आणि प्रतिका रावल हिने कमालीची कामगिरी केली आहे. दोघीनींही शतकीय भागीदारी केली आहे. त्याचबरोबर भारताच्या संघासाठी प्रतिका रावल हिने संघासाठी सलग तिसऱ्यांदा अर्धशतक झळकावले आहे. प्रतिका रावल ही भारतासाठी सातत्याने कमालीची कामगिरी करताना दिसत आहे.
Three matches. Three half-centuries 🔥
Pratika Rawal continues her fine run with the bat ✨
Updates ▶️ https://t.co/xOe6thhPiL#TeamIndia | #INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/PxRnDzJ9Xn
— BCCI Women (@BCCIWomen) January 15, 2025
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामधील पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये भारताच्या संघाने ९ विकेट्सने सामना जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यांमध्ये टीम इंडियाने कर्णधार स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली सामना ११६ धावांनी जिंकला आहे. सलग दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून भारताच्या संघाने मालिकेमध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे.
पहिल्या सामन्यांमध्ये प्रतिका रावल हिने चमकदार कामगिरी करून टीम इंडियासाठी ८९ धावांची खेळी खेळली. सध्या ती सातत्याने संघासाठी कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. तेजल हस्बनीसने पहिल्या सामन्यात ५३ धावा करून अर्धशतक ठोकले होते. तर स्मृती मानधना हिने पहिल्या सामन्यांमध्ये ४१ धावा करून संघासाठी मोलाची कामगिरी केली.
दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर जेमिमाह रॉड्रिक्सने संघासाठी तिच्या करियरचा पाहिलं शतक ठोकलं. जेमिमाहने संघासाठी ९१ चेंडूंमध्ये १०२ धावा केल्या. त्याचबरोबर हरलीन देओल हिने संघासाठी ८९ धावांची महत्वाची खेळी खेळली परंतु तिचे ११ धावांनी शतक हुकले. स्मृती मानधना हिने दुसऱ्या सामन्यांमध्ये देखील संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे. तिने संघासाठी दुसरी सामन्यात ७३ धावा केल्या.