लखनौ : शनिवारी आयपीएलमध्ये दोन सामन्यांची मेजवानी प्रेक्षकांना असणार आहे. पहिला सामना आरसीबी विरुद्ध दिल्ली यांच्यात ३.३० वाजता होणार आहे. नंतर लखनौच्या होम ग्राऊंडवर लखनौ सुपर जायंट्स पंजाब किंग्जशी भिडणार आहेत. लखनौ सुपर जायंट्सने या आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी केल्याने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे. पंजाब किंग्ज या आयपीएल हंगामात चांगलीच मागे पडली आहे. कालच्या सामन्यातसुद्धा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी :
लखनौचा संघ आयपीएलमध्ये नवीन असला तरी त्याने या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सला घरच्या मैदानावर पराभूत करणे कठीण असलेला संघ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. घरच्या मैदानावर एकना स्टेडियमवर खेळले गेलेले दोन्ही सामने लखनौ सुपर जायंट्सने जिंकले आहेत. लखनौ सुपर जायंट्सने या मोसमात खेळल्या गेलेल्या चारपैकी तीन सामने जिंकले असून, गुणतालिकेत दुसरे स्थान कायम राखले आहे.
पंजाब किंग्ज इलेव्हन : प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (क), मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (डब्ल्यू), सॅम कुरान, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर, सिकंदर रझा, हरप्रीत सिंग भाटिया, अथर्व तायडे, गुरनूर ब्रार, बलतेज सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, विद्वत कावेरप्पा, नॅथन एलिस, मोहित राठी, शिवम सिंग
लखनौ सुपर जायंट्स संघ : काइल मेयर्स, केएल राहुल (क), दीपक हुडा, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (डब्ल्यू), जयदेव उनाडकट, मार्क वुड, रवी बिश्नोई, आवेश खान, अमित मिश्रा, आयुष बडोनी, डॅनियल सॅम्स, प्रेरक मंकड, स्वप्नील सिंग, कृष्णप्पा गौथम, मनन वोहरा, क्विंटन डी कॉक, नवीन-उल-हक, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, युधवीर सिंग चरक, करण शर्मा, मयंक यादव