A rain of 13 sky-high sixes, a super flop in IPL Maxwell made a splash in the Major League tournament! He scored an explosive century..
Major League Cricket 2025 : आयपीएल २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियन स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेल पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. अपयशी परंतु, त्याने मेजर लीग क्रिकेट २०२५ मध्ये आपल्या बॅटने मोठी खळबळ उडवून दिली आहे. मॅक्सवेलने १३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने स्फोटक १०६ धावांची धमाकेदार खेळी केली आहे. वॉशिंग्टन फ्रीडमचा कर्णधार मॅक्सवेलने लॉस एंजेलिस नाईट रायडर्सविरुद्ध वादळी खेळी केली आहे. त्याने ४९ चेंडूंचा सामना करताना गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले आणि संघाला ११३ धावांनी मोठा विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
मेजर लीग क्रिकेटच्या आठव्या सामन्यामध्ये, वॉशिंग्टन फ्रीडमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, संघाची सुरुवात मात्र काही चांगली झाली नाही. रचिन रवींद्र हा केवळ ८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर मिचेल ओवेनही ३२ धावा आऊट झाला. तर एड्रिस गॉसने १२ आणि चॅपमनने १७ धावांचे योगदान दिले. संघाने ६८ धावांवर चार विकेट गमावल्यानंतर मॅक्सवेल मैदानात फलंदाजीसाठी आला आणि त्याने कहर केला. ९५ धावांच्या स्कोअरवर जॅक एडवर्ड्स ११ धावा काढून माघारी परतला.
हेही वाचा : चौकार-षटकरांची आतिषबाजी! SRH च्या स्टार फलंदाजाचा MPL 2025 मध्ये राडा! शतकाची हुलकावणी पण खेळीने पैसे वसूल..
६८ धावांवर चार विकेट गमावल्यानंतर मॅक्सवेलने एकट्याने डावाची सूत्रे हाती घेतली आणि ४९ चेंडूत १०६ धावांची नाबाद वादळी खेळी केली. मॅक्सवेल आणि ओबास पिनार यांनी सहाव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचली. या दरम्यान ओबास पिनार याने फक्त १४ धावाच केल्या. तो फक्त मॅक्सवेलला स्ट्राईक देत राहिला होता. त्याच वेळी मॅक्सवेलने १३ षटकार आणि २ चौकार मारून संघाची धावसंख्या २०० पार नेली. लॉस एंजेलिस नाईट रायडर्सकडून कॉर्न ड्रायने आणि टी. संघाने प्रत्येकी २ आणि होल्डरने १ बळी घेतला.
हेही वाचा : ICC मोठ्या बदलांसाठी सज्ज! ४ दिवसांचा असेल कसोटी सामना? भारत आणि ऑस्ट्रेलियासह ‘हे’ पाच देश असतील अपवाद..
प्रत्युत्तरादाखल, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरेलल्या लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघ फक्त ९५ धावांवरच गारद झाला. नाईट रायडर्सकडून सैफ बदरने सर्वाधिक ३२ धावा केल्या. जेसन होल्डरने २३, तर कॉर्न ड्रायने १३ धावा केल्या. यादरम्यान सात फलंदाजांना दुहेरी आकडा देखील गाठत आला नाही. चार फलंदाजांना तर त्यांचे खातेही उघडता आले नाही. वॉशिंग्टन फ्रीडमकडून सौरभ नेत्रावलकरने शानदार गोलंदाजी करत ६ धावांत ३ बळी घेतले. मिशेल ओवेनने ३, जॅक एडवर्डने ३, मार्क अडायरने १ बळी टिपला.