MCA Women's Cricket League : कर्णधार वृषाली भगतची अष्टपैलू चमक; भामा सीसीचा 42 धावांनी विजय

एमसीए महिला क्रिकेट लीग 2026 मध्ये कर्णधार वृषाली भगतने 96 चेंडूंत 106 धावांची शतकी खेळी करत भामा सीसीला ग्लोरियस सीसीविरुद्ध 42 धावांनी विजय मिळवून दिला. स्पर्धेत भारत, राजवाडी, दिलीप वेंगसरकर फाउंडेशन आणि दहिसर संघांनीही बाजी मारली.
MCA Women's Cricket League : कर्णधार वृषाली भगतची अष्टपैलू चमक; भामा सीसीचा 42 धावांनी विजय
MCA Women's Cricket League : कर्णधार वृषाली भगतची अष्टपैलू चमक; भामा सीसीचा 42 धावांनी विजयMCA Women's Cricket League : कर्णधार वृषाली भगतची अष्टपैलू चमक; भामा सीसीचा 42 धावांनी विजय
Published on: 
Updated on: 
  • स्पर्धेत अनेक संघांचा दणदणीत विजय

  • दहिसर एससीचा निसटता सामना

  • दिलीप वेंगसरकर फाउंडेशनचा दणदणीत विजय

MCA Women's Cricket League : एमसीए महिला लीगच्या (डायना एडुलजी ट्रॉफी) दुसऱ्या फेरीतील सामन्यात कर्णधार वृषाली भगत हिच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भामा सीसीने ग्लोरियस सीसीविरुद्ध 42 धावांनी विजय मिळवला.

वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात बुधवारी प्रथम फलंदाजी करताना भामा सीसीने 39 षटकांत 8 बाद 244 धावा केल्या. सलामीवीर वृषालीची (96 चेंडूंत 106 धावा) झंझावाती शतकी खेळीचा त्यात मोठा वाटा होता. तिच्या या खेळीत 14 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. वृषालीला तुषी शाहची (34 धावा) चांगली साथ लाभली. ग्लोरियस सीसीकडून स्वरा जाधवने 20 धावांत 3, तर वैष्णवी पालवने 37 धावांत 2 विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल, ग्लोरियस सीसी संघ 40 षटकांत 8 बाद 202 धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यात अष्टपैलू खेळाडू स्वरा जाधवने सर्वाधिक 75 धावा केल्या. भामा सीसीकडून कृतिका यादवने 29 धावांत 2, तर वृषाली भगतने 31 धावांत 2 विकेट मिळवल्या.

दहिसर एससीचा निसटता सामना

एका अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक सामन्यात, दहिसर एससीने रीगल एफसीवर 2 धावांनी निसटता विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दहिसर सीसीचा संघ 36.2 षटकांत 118 धावांत आटोपला. त्यांच्याकडून सोनाक्षी सोलंकीने सर्वाधिक 41 धावा केल्या. रीगल एफसीकडून गौरी मांजरेकरने 28 धावांत 4, प्रियदर्शनी सिंगने 22 धावांत 2 आणि चेतना बिषाने 23 धावांत 2 विकेट टिपल्या. रीगल सीसी संघाचा डाव 40 षटकांत 116 धावांत संपला. सृष्टी नाईकने 32 धावा केल्या. नष्नव देसाईने 24 धावांत 3 व प्रिया मिसाळने 13 धावांत 2 विकेट घेतले.

MCA Women's Cricket League : कर्णधार वृषाली भगतची अष्टपैलू चमक; भामा सीसीचा 42 धावांनी विजय
Big Breaking: क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार! एकाच टीममध्ये पुरुष-महिला खेळणार; Zaheer khan च्या 'Equal' ची घोषणा

दिलीप वेंगसरकर फाउंडेशनचा दणदणीत विजय

भारत क्रिकेट क्लबने फोर्ट यंगस्टर्सवर २५ धावांनी मात केली. भारतने ४० षटकांत नऊ बाद १९२ धावा केल्या. चिन्मयी चिलीने ७५, तर राजसी नागोसेने ३० धावा केल्या. प्रत्युत्तरात फोर्ट यंगस्टर्सचा डाव ३६ षटकांत १६७ धावांवर आटोपला. गगना मुलकाला हिने चार बळी घेतले.

राजवाडी क्रिकेट क्लबने माटुंगा जिमखान्याचा पाच गडी राखून पराभव केला. माटुंगा संघाचा डाव १४१ धावांवर संपुष्टात आला. राजवाडीकडून दीक्षा पवारने ५१ धावांची खेळी करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने व्हिक्टरी क्रिकेट क्लबवर सहा गडी राखून विजय मिळवला. फातिमा जाफरने ५३ धावा करत संघाच्या विजयात योगदान दिले. दहिसर स्पोर्ट्स क्लबने रीगल क्रिकेट क्लबचा सहा धावांनी पराभव केला. या सामन्यात गौरी मांजरेकरने चार बळी घेतले. साईनाथ क्रिकेट क्लबने जॉन ब्राइट क्रिकेट क्लबवर चार गडी राखून मात केली. श्रावणी पाटीलने ३४ धावा आणि तीन बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली.

MCA Women's Cricket League : कर्णधार वृषाली भगतची अष्टपैलू चमक; भामा सीसीचा 42 धावांनी विजय
Sachin Tendulkar Foundation : सारा आणि सानिया तेंडुलकर यांची रांचीतील युवा शाळेला भेट; मुलींसाठी उभारणार नवी शाळा