Sachin Tendulkar Foundation : सारा आणि सानिया तेंडुलकर यांची रांचीतील युवा शाळेला भेट; मुलींसाठी उभारणार नवी शाळा

सारा आणि सानिया तेंडुलकर यांनी रांचीतील युवा शाळेला भेट दिली. यावेळी सचिन तेंडुलकर फाउंडेशनने युवाच्या मुलांसाठी नवीन शाळा उभारण्याची घोषणा केली. फुटबॉल आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणाला चालना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
Sachin Tendulkar Foundation : सारा आणि सानिया तेंडुलकर यांची रांचीतील युवा शाळेला भेट; मुलींसाठी उभारणार नवी शाळा
Sachin Tendulkar Foundation : सारा आणि सानिया तेंडुलकर यांची रांचीतील युवा शाळेला भेट; मुलींसाठी उभारणार नवी शाळाSachin Tendulkar Foundation : सारा आणि सानिया तेंडुलकर यांची रांचीतील युवा शाळेला भेट; मुलींसाठी उभारणार नवी शाळा
Published on: 
Updated on: 
  • सचिन तेंडुलकर फाउंडेशनचा पुढाकार

  • युवा संस्थेचा संयुक्त उपक्रम

  • फुटबॉल, शिक्षणातून मुलींच्या सक्षमीकरणाला बळ

Sachin Tendulkar Foundation : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर आणि सानिया तेंडुलकर यांनी झारखंडमधील रांची येथील 'युवा' (Yuwa) शाळेला भेट दिली. यावेळी दोघींनी शाळेतील विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाचा आणि फुटबॉलमधील सहभागाचा अनुभव जाणून घेतला. विशेष म्हणजे, या भेटीदरम्यान सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या (STF) वतीने युवाच्या मुलांसाठी नवीन शाळा उभारण्याची घोषणा करण्यात आली.

विद्यार्थिनींच्या दैनंदिन उपक्रमाची घेतली माहिती

सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकर फाउंडेशनची संचालिका आहे. तिने क्रिकेटपटू अर्जुन तेंडूलकरची पत्नी सानिया तेंडुलकर हिच्यासह शाळेला भेट देऊन विद्यार्थिनींच्या दैनंदिन उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी विद्यार्थिनींनी आपले अनुभव, संघर्ष आणि स्वप्नांविषयी त्यांच्याशी संवाद साधला.

झारखंडमधील वंचित समुदायातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी युवा संस्था गेल्या दोन दशकांपासून काम करत आहे. फुटबॉलला माध्यम बनवून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणे, हा संस्थेच्या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

मुलांना दर्जेदार सुविधा मिळणार

सचिन तेंडुलकर फाउंडेशन आणि युवा संस्था यांच्यात आधीपासूनच भागीदारी आहे. आता या भागीदारीला नवे स्वरूप देत दोन्ही संस्था युवाच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारणार आहेत. या उपक्रमामुळे मुलांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक सुविधा आणि पोषक वातावरण उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर स्वतःची आवड जोपासण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे, या विचारातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

या भेटीमुळे शिक्षण आणि क्रीडा यांच्या माध्यमातून ग्रामीण व वंचित भागातील मुलींच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना नवे बळ मिळणार आहे.