Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वचषकातील सर्वात हायव्होल्टेज आणि अंतिम सामन्यासाठी अंपायर्सचे मेगा पॅनल तयार, टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारे एक नाव, या अंपायरमुळे धाकधूक वाढली

ODI World Cup 2023 : विश्वचषकातील महत्त्वाचा आणि अंतिम सामना उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या अंतिम लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी स्टेडियम प्रेक्षकांनी तुडुंब भरले जाणार आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 18, 2023 | 03:45 PM
Mega panel of umpires ready for megafinal

Mega panel of umpires ready for megafinal

Follow Us
Close
Follow Us:

India vs Australia ICC World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) मधील अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या दोन संघात रंगणार आहे. अवघ्या काही तासांत एकदिवसीय क्रिकेटमधील नवी चॅम्पियन मिळणार आहे. भारताला तब्बल एक दशकानंतर विश्वचषक जिंकण्याची संधी आहे, त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

अंतिम सामन्यात ‘हा’ पंच भारताचं टेन्शन वाढवणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक 2023 मधील अंतिम सामना रंगणार आहे. आयसीसीने या महाअंतिम सामन्यासाठी रिचर्ड इलिंगवर्थ (Richard Illingworth) आणि रिचर्ड केटलबरो (Richard Kettleborough) या दोन इंग्लंडच्या (England) अंपायर्सवर मैदानी पंच (On-Field Umpires) ही जबाबदादी देण्यात आल्याचं आयसीसीनं सांगितलं आहे. याआधीच्या भारत आणि न्यूझीलंड (India va New Zealand) यांच्यातील उपांत्य फेरीसाठी इलिंगवर्थ हे दोन मैदानी पंचांपैकी एक होते, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीत केटलबरो हे ऑन फिल्ड-अंपायर होते.

थर्ड आणि फोर्थ अंपायर कोण
वेस्ट इंडीजचे (West Indies) जोएल विल्सन (Joel Wilson) आणि न्यूझीलंडचे (New Zealand) क्रिस्टोफर गॅफनी (Christopher Gaffaney) हे फायनलसाठी तिसरे (Third Umpire) आणि चौथे पंच (Fourth Umpire) असतील. तर, झिम्बाब्वे (Zimbabwe) अँडी पायक्रॉफ्ट (Andy Pycroft) सामनाधिकारी (Match Referee) असतील. अँडी पायक्रॉफ्ट यांच्यासह जोएल विल्सन आणि क्रिस्टोफर गॅफनी दोघेही दोन उपांत्य फेरीतही पंच होते.

या स्पर्धेच्या आधी नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका दरम्यान पंच म्हणून वनडेचे शतक पूर्ण करणारा केटलबरो दुसऱ्यांदा विश्वचषक फायनलमध्ये मैदानी पंच म्हणून काम करेल. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 2015 च्या फायनलमध्ये 50 वर्षीय कुमार धर्मसेनासोबत उभा होता.

केटलबरो आणि इलिंगवर्थ हे डेव्हिड शेहर्ड ट्रॉफीचे यापूर्वीचे विजेते आहेत, आयसीसी (ICC) कडून दरवर्षी उत्कृष्ट पंचांना हा गौरव देऊन सन्मानित केलं जातं. केटलबरो यांनी 2013 आणि 2015 दरम्यान सलग तीन वर्ष हा पुरस्कार मिळवला आहे, तर इलिंगवर्थ यांनी 2019 आणि 2022 मध्ये हा पुरस्कार मिळवला.

अंतिम सामन्यासाठी पंच आणि सामना अधिकारी कोण? पाहा संपूर्ण यादी
मैदानावरील पंच (On-Field Umpires) : रिचर्ड इलिंगवर्थ आणि रिचर्ड केटलबरो
सामनाधिकारी (Match Referee) : अँडी पायक्रॉफ्ट
तिसरा पंच (Third Umpire) : जोएल विल्सन
चौथा पंच (Fourth Umpire) : क्रिस्टोफर गॅफनी
रिचर्ड केटलबरो आणि टीम इंडियाचं ‘कनेक्शन’
रिचर्ड केटलबरो यांची नियुक्ती भारतासाठी चिंताजनक मानली जात आहे. टीम इंडियाचा समावेश असलेल्या आयसीसी टूर्नामेंट नॉकआऊट सामन्यात केटलबरो पहिल्यांदाच पंच म्हणून काम करणार नसून याआधीही त्यांनी ही जबाबदारी पार पाडली आहे. 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शेवटचं ICC विजेतेपद मिळाल्यापासून भारताने विविध ICC स्पर्धांमध्ये आठ बाद फेरीत सहभाग घेतला आहे, यापैकी सात सामन्यांमध्ये केटलबरो अंपायर पॅनेलचा भाग होते. या सर्व सामन्यांमध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं.

2014 टी-20 वर्ल्डकप फायनल विरुद्ध श्रीलंका, 2015 वर्ल्ड कप सेमीफायनल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल विरुद्ध पाकिस्तान आणि 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल विरुद्ध न्यूझीलंड. भारत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेल्या दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ते टीव्ही अंपायर होते. ICC T20 विश्वचषक 2022 इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीचा सामना या एकमेव बाद फेरीच्या सामन्या केटलबरो अंपायर पॅनलचा भाग नव्हते. पण, या सामन्यातही भारताचा 10 विकेट्सने पराभव झाला होता.

 

Web Title: Mega panel of umpires ready for megafinal one name to raise tension for team india intimidation increased because of this umpire nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2023 | 03:45 PM

Topics:  

  • ICC World Cup 2023
  • India Vs Australia
  • Narendra Modi Stadium

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ विश्वचषकाआधी भिडणार! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming
1

IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ विश्वचषकाआधी भिडणार! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची मोठी परीक्षा! BCCI चा ‘हा’ नवा नियम ठरवणार ‘हिटमॅन’च्या कारकिर्दीचे भविष्य
2

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची मोठी परीक्षा! BCCI चा ‘हा’ नवा नियम ठरवणार ‘हिटमॅन’च्या कारकिर्दीचे भविष्य

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव
3

IND vs AUS : सामना गमावला… मालिका जिंकली! शेफाली वर्माची मेहनत पाण्यात, एलिसा हिलीची शतकीय खेळी; भारताचा 9 विकेट्सनी पराभव

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य
4

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.