तब्बल ३६ वर्षांनंतर अर्जेंटीनाला पुन्हा एकदा फिफा विश्वचषक जिंकून दिल्यामुळे लिओनेल मेस्सीचा जगभरात डंका वाजत आहे. अर्जेंटिना फुटबॉल संघ विश्वविजेता झाल्यामुळे लिओनेल मेस्सीची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. अशातच मेस्सीच्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. अर्जेंटिना सरकार लवकरच देशात चलनात येणाऱ्या पैशांच्या नोटेवर मेस्सीचा फोटो छापणार असल्याची माहिती समोर येत आहे.
फिफा विश्वचषक ट्रॉफीसह संपूर्ण अर्जेंटिना संघ मायदेशी पोहोचल्यावर, त्यांचं तेथे जोरदार स्वागत करण्यात आलं. जवळपास ४ लाख नागरिक त्याठिकाणी उपस्थित होते. इतकंच नाही, तर मेस्सी त्याच्या गावी पोहोचल्यानंतरही त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. अर्जेंटिना सरकार आपल्या नोटेवर (Argentina Currency) मेस्सीचा फोटो लावण्याच्या मनस्थितीत असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
BREAKING: Argentina are considering putting Lionel Messi on their banknotes ??
Officials of their financial governing body are looking to mark their nation’s historic World Cup triumph ?
Via El Financiero newspaper. pic.twitter.com/SJGxpltVrX
— SPORTbible (@sportbible) December 21, 2022
अर्जेंटिना सरकारनं (Argentina Government) आपली कल्पना अंमलात आणून तेथील नोटेवर मेस्सीचा फोटोही छापला आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर एखाद्या खेळाडूच्या फोटोला देशाच्या चलनावर स्थान मिळण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. विश्वचषकाच्या आनंदात देशाला सर्वात मोठा सन्मान किंवा सर्वात मोठा पुरस्कार मिळतो, हे आपण पाहिलंय. पण, हा प्रकार नक्कीच पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. मात्र, अद्याप याला अजूनही अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीय.
फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनानं फ्रान्सचा पराभव करून तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. यापूर्वी त्यांनी 1978 आणि 1986 मध्ये हे विजेतेपद पटकावलं होतं. त्या जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे हे पहिलेच विश्वचषक विजेतेपद होते.