MLC 2025: Kieron Pollard equals Bravo's 'that' world record! Special history created in T20...
MLC 2025 : वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने आपल्या नावावर ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. पोलार्डने टी-२० क्रिकेटममध्ये अजून एक इतिहास रचला आहे. मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक पोलार्डने एमआय न्यू यॉर्कला मेजर लीग क्रिकेट २०२५ चे विजेतेपद जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. यासोबतच पोलार्ड आता टी-२० क्रिकेट इतिहासात सर्वाधिक फायनल जिंकणारा खेळाडू बनला आहे.
अंतिम सामन्यात एमआय न्यू यॉर्कने वॉशिंग्टन फ्रीडमचा ५ धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात पोलार्ड खेळाडू म्हणून सहभागी होता. त्याने त्याच्या टी-२० कारकिर्दीतील ३० वा फायनल सामना खेळला आहे. या विजयासह, पोलार्डने खास विक्रम केला आहे. त्याने त्याचा १७ वा टी-२० फायनल विजय त्याच्या नावावर जमा केला आहे. या कामगिरीसोबत त्याने त्याचा देशबांधव आणि वेस्ट इंडिजचा माजी स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्होच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. ब्राव्होने त्याच्या कारकिर्दीत २६ फायनल सामने खेळले असून त्यात त्याने १७ सामन्यात विजय मिळवला आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : आर्चरमुळे भारत अडचणीत; पंत मागोमाग सुंदरचा अप्रतिम झेल टिपत दाखवला बाहेरचा रस्ता, पहा व्हिडीओ
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शोएब मलिकने टी-२० क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून २२ फायनल सामने खेळेल आहेत. यामध्ये त्याने एकूण १६ फायनल जिंकण्याची किमया साधली आहे. मलिकने जगातील अनेक लीगमध्ये आपली क्षमता दाखवून दिली आहे. तो जवळजवळ सर्व लीगमध्ये खेळलेला खेळाडू आहे.
भारतीय स्फोटक फलंदाज रोहित शर्माने आतापर्यंत खेळाडू म्हणून १८ टी-२० फायनल खेळलेया असून त्यामध्ये त्याने ११ सामन्यांत विजय मिळवण्यात यश मिळवले आहे. तो आयपीएल वगळता इतर कोणत्याही टी-२० लीगमध्ये खेळत नाही. २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वेस्ट इंडिजचा धोकादायक अष्टपैलू सुनील नरेननेही त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ११ टी-२० फायनल सामने जिंकले आहेत. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १२ फायनल खेळले आहेत.
या यादीतील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे टॉप ५ मध्ये तीन खेळाडू हे वेस्ट इंडिजचे आहेत. यावरून टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचा दबदबा दिसुन येतो. पोलार्ड, ब्राव्हो आणि नरेन सारख्या खेळाडूंनी अनुभव, ताकद आणि खेळाची समज यामुळे ते कोणत्याही संघाला विजेतेपद मिळवून देण्यात पटाईत असल्याचे दिसून येते.