फोटो सौजन्य – X (Cognizant Major League Cricket)
MLC 2025 Update : मेजर क्रिकेट लीग 2025 मध्ये सुरु आहे, यामध्ये १९ वा सामना वॉशिंग्टन फ्रीडम आणि सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स या दोन संघामध्ये खेळवण्यात आला. हा सामना फारच मनोरंजक राहिला, वॉशिंग्टन फ्रीडमने हा सामना १२ धावांनी जिंकला. या हंगामात वॉशिंग्टन फ्रीडमचा हा सहावा विजय आहे आणि संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. या सामन्यात वॉशिंग्टन फ्रीडमचा एक खेळाडू फलंदाजीत अपयशी ठरला आणि खाते न उघडता बाद झाला, तर या खेळाडूने गोलंदाजीत अद्भुत कामगिरी दाखवली.
गोलंदाजीत या खेळाडूने ५ बळी घेत सामना उलटला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वॉशिंग्टन फ्रीडमने २० षटकांत ६ गडी गमावून १६९ धावा केल्या. वॉशिंग्टनकडून फलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ५८ धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान फिलिप्सने २ चौकार आणि ३ षटकार मारले. याशिवाय जॅक एडवर्डने ४२ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. त्याच वेळी मायकेल ओवेन फलंदाजीत वाईटरित्या अपयशी ठरला.
सुर्याचा ऐतिहासिक कॅच, विराटची दमदार खेळी! या दिनी भारताच्या संघाने 11 वर्षानंतर जिंकला विश्वचषक
ओवेन पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. तथापि, ओवेनने गोलंदाजीत अद्भुत कामगिरी दाखवली. फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर, मायकेल ओवेनने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. गोलंदाजी करताना मायकेल ओवेनने ३ षटकांत फक्त १७ धावा देत ५ बळी घेतले. ज्यामुळे वॉशिंग्टन फ्रीडमने हा सामना जिंकला. त्याच्या शानदार कामगिरीमुळे मायकेल ओवेनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
Mitchell Owen single-handedly turned this game around, picking up an incredible five-wicket haul for the @WSHFreedom! This win made WF the second team to qualify for the playoffs in July. 💥 pic.twitter.com/iMM7CQUMFj
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) June 29, 2025
वॉशिंग्टन फ्रीडमने दिलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा संघ २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १५९ धावाच करू शकला. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून फलंदाजी करताना मॅथ्यू शॉर्टने ४० चेंडूत सर्वाधिक ६७ धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान शॉर्टने ४ चौकार आणि ६ षटकार मारले, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. 20 वा सामना हा एलए नाइट राइडर्स विरुद्ध सिएटल ऑर्कस यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात सिएटल ऑर्कसच्या संघाने एलए नाइट राइडर्सला ५ विकेट्सने पराभुत केले.