Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नांदेडचा शिवराज राक्षे 2023चा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता; सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटातच केले पराभूत, बक्षिसाची रक्कम माहिती आहे का?

उपांत्य सामन्यात माती विभागातून पैलवान महेंद्र गायकवाडने पैलवान सिंकदर शेखचा पराभव केला. तर मॅट विभागातील सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला 8-2 अशा एकतर्फी फरकाने चितपट करत अंतिम सामन्यात धडक मारली. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्या दोघांमध्ये केसरी गदासाठी कडवी झुंज पाहायला मिळाली.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 15, 2023 | 08:49 AM
Shivraj Rakshe

Shivraj Rakshe

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने तसेच ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari Wrestling Tournament)  किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. काल या स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. दरम्यान, 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत नांदेडचा (Nanded) पैलवान शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी ठरला आहे. नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने ‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) याला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला आहे.

[read_also content=”भारत-श्रीलंका यांच्यात आज फायनल! लंकेला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा प्रयत्न, ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी? सामना कुठे व कसा पाहणार… https://www.navarashtra.com/sports/india-and-sri-lanka-today-final-match-india-attempt-to-give-a-clean-sweep-to-lanka-these-players-will-get-a-chance-where-and-how-to-watch-the-match-361766.html”]

एवढ्यावरच थांबायचे नाही

दरम्यान, स्पर्धा जिंकल्यानंतर शिवराजने सांगितलं की, ” मी एका सामान्य घरातील मुलगा आहे. मला माझ्या वडिलांनी नेहमीच साथ दिली आहे. माझ्या वडिलांना मला ऑलम्पिकमध्ये खेळताना बघायचं आहे आणि त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने लढणार आहे.” महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा आता शिवराजने जिंकली आहे. पण आता फक्त एवढ्यावर तो थांबणार नाही. कारण शिवराजला आता ऑलिम्पिकमध्ये खेळायचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. असं शिवराजने सांगितले आहे, त्यामुळं आता सर्व स्तरातून शिवराजचे कौतूक होत आहे.

बक्षिसांची खैरात…

उपांत्य सामन्यात माती विभागातून पैलवान महेंद्र गायकवाडने पैलवान सिंकदर शेखचा पराभव केला. तर मॅट विभागातील सेमी फायनलमध्ये शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला 8-2 अशा एकतर्फी फरकाने चितपट करत अंतिम सामन्यात धडक मारली. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्या दोघांमध्ये केसरी गदासाठी कडवी झुंज पाहायला मिळाली. मात्र अखेर शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाड याच्यावर मात करत महाराष्ट्र केसरी ठरला. त्यामुळं महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे याला केसरी गदा रोख 5 लाख रुपये, आणि महिंद्रा थार गाडी मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाड याला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.

कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ…

कुस्तीपटूंच्या मानधनात तीनपटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र केसरीच्या कार्यक्रमात केली. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या कुस्तीपटूंचे मानधन ६ हजार वरून २० हजार, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचे मानधन ६ हजार वरून २० हजार तर हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी व रुस्तुम ए हिंद या कुस्तीगिरांचे मानधन ४ हजार वरून १५ हजार इतके करण्यात येईल. तसेच कुस्तीगिरांचे निवृत्ती वेतन अडीच हजारांवरून साडे सात हजार करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी आश्वासित केले.

Web Title: Nanded shivraj rakshe this year winner of maharashtra desari defeated mahendra gaikwad of solapur within a few minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2023 | 08:47 AM

Topics:  

  • Maharashtra Kesari
  • Shivraj Rakshe

संबंधित बातम्या

वादग्रस्त पंच नितेश काबिले यांच्यावर तीन वर्षांची बंदी, चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई
1

वादग्रस्त पंच नितेश काबिले यांच्यावर तीन वर्षांची बंदी, चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.