यूजीन : ऑलिम्पिक पदक विजेता (Olympic Medalist) नीरज चोप्राने (Niraj Chopra) पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरासह भालाफेक वर्ल्ड अॅथलेटिक्स (Javelin Throw) स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. पात्रतेसाठी, खेळाडूला किमान ८३.५० मीटर अंतरावर भालाफेक करण्याचे उद्दिष्ट होते. पहिल्याच थ्रोमध्ये तो अंतिम फेरीसाठी पात्र (Qualified For The Finals) ठरला.
फायनलमध्ये जाण्यासाठी पात्रता गुण ८३.५० मीटर ठेवण्यात आली होती. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात त्याने अंतर कापले आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. वर्षातील हा त्याचा तिसरा सर्वोत्तम थ्रो आहे. झेक प्रजासत्ताकच्या जाकुब व्हॅद्लेचने त्याच्यापाठोपाठ ८५.२३ मीटरसह फायलनमधील स्थान पक्के केले असून तो दुसरा खेळाडू ठरला. कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजला आता रविवारी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची १९ वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची संधी आहे. फायनल रविवारी सकाळी होणार आहे.
नीरज चोप्राने फिनलँडमध्ये ८९.३० मीटर भालाफेक करत रौप्य पदकाची कमाई केली होती. तसेच, त्याने डायमंड लीगमध्ये ८९.९४ मीटर भालाफेक करत दुसरे स्थान पटकावले होते. फायनलमध्ये त्याचे लक्ष्य हे ९० मीटरचा बेंचमार्क पार करण्याचे असेल. त्याच्याकडून पदकाची अपेक्षा नक्कीच आहे. जर त्याने पदक जिंकले तर तो वर्ल्ड अॅथलेटिक्स अजिंक्यपद (World Athletics Championships) स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला देशातला पुरूष खेळाडू ठरेल.