Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट जगतातून मोठी बातमी! न्यूझीलंडच्या ‘या’ स्टार खेळाडूची अचानक निवृत्ती; १८ वर्षांची झळाळती कारकीर्द संपली

New Zealand Jeet Raval announced Retirement: न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू असलेल्या जीत रावलने निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये प्रभावी कारकीर्द घडवली होती.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 09, 2026 | 02:44 PM
Jeet Raval announced Retirement

Jeet Raval announced Retirement

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडचा माजी कसोटीपटू निवृत्त
  • जीत रावलची निवृत्तीची घोषणा
  • फर्स्ट क्लासमध्ये 10 हजारांहून अधिक धावा
न्यूझीलंडचा माजी सलामीवीर जीत रावलने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. या ३८ वर्षीय भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूने २०१६ ते २०२० दरम्यान न्यूझीलंडसाठी २४ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये १०,००० हून अधिक धावा केल्या. तो २०२० पासून न्यूझीलंड संघात परतला नाही. राष्ट्रीय संघापासून सहा वर्षे दूर राहिल्यानंतर अखेर त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. (New zealand Jeet Raval announced Retirement)

भारतात खेळण्यास नकार देणं पडलं महागात? पाकिस्तानची Champions Trophy स्पर्धेतून हकालपट्टी; ‘या’ संघाची थेट एन्ट्री

जीत रावलने केली निवृत्तीची घोषणा

३८ वर्षीय जीत रावलने २०२६-२७ च्या देशांतर्गत हंगामापूर्वी निवृत्तीची घोषणा केली. नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स क्रिकेट असोसिएशनला आपल्या निवृत्तीबद्दल माहिती देताना तो म्हणाला की, ‘हा निर्णय घेताना त्याला खूप अभिमान वाटत आहे. मी माझ्या निर्णयावर पूर्णपणे आनंदी आणि समाधानी आहे. लहानपणापासूनच न्यूझीलंडसाठी खेळण्याचे हे माझे स्वप्न होते आणि मी त्या दिवसांकडे मोठ्या अभिमानाने पाहतो. हे केवळ माझेच नाही, तर वडिलांचेही स्वप्न होते. माझ्या वडिलांना न्यूझीलंडमध्ये एका चांगल्या भविष्याची आशा दिसली आणि त्यांनी संपूर्ण कुटुंबाला स्थलांतरित केले, जेणेकरून मी क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल.’

जीत रावलची कारकीर्द

जीत रावलचा जन्म सप्टेंबर १९८८ मध्ये गुजरातच्या अहमदाबाद येथे झाला. त्याने विद्यानगर शाळेत शिक्षण घेतले, जिथे लहानपणी तो भारतीय विकेटकीपर-फलंदाज पार्थिव पटेलसोबत डावाची सुरुवात करायचा. त्याने गुजरातच्या १५ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील संघांकडूनही क्रिकेट खेळले. २००४ मध्ये, वयाच्या १६ व्या वर्षी, ते आपल्या कुटुंबासह न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे स्थलांतरित झाला.

जीतचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०,००० पेक्षा जास्त धावा

जीत हा न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीच्या फलंदाजांपैकी एक होता.  त्याने आपल्या प्रथम-श्रेणी कारकिर्दीत १६४ सामने खेळताना ३७.६६ च्या सरासरीने १०,४३२ धावा केल्या. यामध्ये २४ शतके आणि ५० अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडच्या प्रमुख देशांतर्गत स्पर्धांपैकी असलेल्या प्लंकेट शील्डमध्ये त्याने ८,६६२ धावा केल्या.

आंतरराष्ट्रीय स्तरावर जीत रावलने न्यूझीलंडकडून २४ कसोटी सामने खेळले. ३९ डावांत त्याने १,१४३ धावा केल्या. यामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळला. तब्बल १८ वर्षांच्या प्रथम-श्रेणी कारकिर्दीनंतर त्याने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

Kusal Mendis: श्रीलंकेचा नवा टेस्ट कर्णधार ठरला! कुसल मेंडिसच्या हाती संघाची कमान; बोर्डाचा मोठा निर्णय

Web Title: New zealand cricketer jeet raval announces retirement 10000 runs in first class cricket pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • New Zealand Cricket
  • New Zealand cricket team
  • Retirement

संबंधित बातम्या

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…
1

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.