PAK vs NZ: Big blow for New Zealand! Big player out of ODI series against Pakistan
PAK vs NZ : न्यूझीलंडचा फलंदाज मार्क चॅपमन पाकिस्तानविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना खेळणार नाही. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला शनिवारी हॅमिल्टनमधील सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्यात त्याच्या जागी फलंदाज टिम सेफर्ट खेळेल. चॅपमन मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही खेळू शकला नाही. नेपियरमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानवर ७३ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने दुसरा एकदिवसीय सामना ८४ धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजिंक्य ANZ आघाडी घेतली. एकदिवसीय मालिकेपूर्वी दोघांमध्ये टी-२० मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेतही पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. किवी संघाने मालिका ४-१ अशी जिंकली.
हेही वाचा : PBKS vs RR : आज पंजाब किंग्ज-राजस्थान रॉयल्स आमनेसामने; जयस्वालच्या खेळीकडे असणार लक्ष..
माउंट मौनगानुई येथे खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यासाठी चॅपमन तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आशा न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाने लावून धरली होती. पण, फिटनेस टेस्टमध्ये चॅपमन नापास झाला. त्यानंतर तिसऱ्या वनडेतूनही त्याला वगळण्यात आले आहे. सध्या कोणताही धोका पत्करला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.
NZC ने सांगितले की, शुक्रवारी प्रशिक्षणादरम्यान करण्यात आलेल्या मूल्यांकनात असे दिसून आले आहे की, मालिकेच्या अंतिम सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान घेण्यासाठी फलंदाज पुरेसा सावरलेला नाही. हॅमिल्टनमध्ये चॅपमनच्या ऐवजी आघाडीचा फलंदाज टिम सेफर्ट शनिवारी तिसऱ्या वनडेसाठी संघासोबत असणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा : CSK vs DC : सीएसके विजयीपथावर येणार? घरच्या मैदानावर करणार दिल्लीशी दोन हात, जाणून घ्या A टू Z माहिती..
अलीकडेच न्यूझीलंड संघाने पाकिस्तानविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 4-1 ने विजय संपादन केलअ आहे. ज्यामध्ये सेफर्ट हा प्लेअर ऑफ द सीरीज ठरला होता, परंतु 30 वर्षीय खेळाडूला अद्याप तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये देशासाठी वेगळे काही करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत.
पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेत न्यूझीलंडने घरच्या मैदानावर पाकिस्तानवर आपला दबदबा राखला आहे. न्यूझीलंडने T20 मालिकेत 4-1 असा मोठा विजय मिळवला. त्यांनंतर त्यांनी पहिला एकदिवसीय सामना 73 धावांनी जिंकला तसेच दुसरा सामना देखील 84 धावांनी जिंकून 2-0ने मालिकेत आघाडी घेत मालिका खिशात घातली. पाकिस्तानच्या संघाची परिस्थिति अतिशय वाईट असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानकडून आता तिसऱ्या सामन्यात तरी विजयाची अपेक्षा असणार आहे.