French Open: Jannik Sinner's impressive victory, while Novak Djokovic also advances to the third round.
French Open : सर्बियाचा नोवाक जोकोविच फ्रेंच ओपन २०२५ मध्ये चांगला वेळ घालवत असल्याचे दिसत आहे. २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता जोकोविचने फ्रेंच खेळाडू कोरेंटिन मौटेटचा ६-३, ६-२, ७-६ असा पराभव करून पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत दिमाखात प्रवेश केलाया आहे. या सामन्यात, त्याच्या डाव्या पायात काही समस्या होती, ज्यामुळे त्याने मेडिकल टाइमआउट घेतला, परंतु तरीही, त्याने जोरदार पुनरागमन केले आणि टायब्रेकरमध्ये वर्चस्व गाजवले. इटालियन टेनिसपटू जॅनिक सिनरनेही पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
हेही वाचा : MI vs GT : हिटमॅन ‘शो’ कायम! IPL मध्ये Rohit Sharma ने केली ‘ही’ दमदार कामगिरी..
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सिनरने दुसऱ्या फेरीत फ्रेंच अनुभवी रिचर्ड गॅस्केचा ६-३, ६-०, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना गॅस्केच्या २३ वर्षांच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता, ज्यामध्ये त्याला कोर्टवर भावनिक निरोप देण्यात आला. या विजयासह, २३ वर्षीय सिनेरने ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सलग १६ वा विजय नोंदवला आहे, जो २००८ मध्ये राफेल नदालच्या १९ सामन्यांच्या विजयानंतरचा सर्वात मोठा विजय आहे. सिनरचा पुढील सामना तिसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकचा खेळाडू जिरी लेहेकाशी होईल.
जर्मन टेनिसपटू अलेक्झांडर इवेरेव्हने २०२५ च्या फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्याने डच खेळाडू जास्पर डी जोंगला ३-६, ६-१, ६-२, ६-३ अशा चार सेटमध्ये हरवले. सामन्याच्या सुरुवातीलाच डी जोंगने इवेरेव्हला त्रास दिला, परंतु दुसऱ्या सेटपासून इवेरेव्हने वेग वाढवत सामन्यावर नियंत्रण मिळवले. आता तिसऱ्या फेरीत त्याचा सामना इटलीच्या मॅटेओ अर्नाल्डी आणि फ्लेव्हियो कोबोली यांच्यातील सामन्यातील विजेत्याशी होईल.
३० मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने गुजरातचा २० धावांनी पराभव केला. या पराभवाने गुजरात टायटन्सचे या स्पर्धेतील प्रवासाचा शेवट झाला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २२८ धावा केल्या. यामध्ये रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून मुंबईला २०० पार पोहचवले. तर प्रत्युउत्तरात गुजरात टायटन्सचा संघ २०८ धावा करू शकला. परिणामी मुंबईकडून २० धावांनी पराभूत व्हावे लागले.