रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
MI vs GT : आयपीएल २०२५ च्या रोमांचक एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभूत केले आहे. या परभवामुळे गुजरात टायटन्सचा या स्पर्धेतील प्रवास थांबला आहे. हार्दिक -पांड्याने नानेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या (५० चेंडूत ८१ धावा) अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने २२८ धावा केल्या. प्रत्युउत्तरात गुजरात टायटन्स संघ २०८ धावाच करू शकला. मुंबईच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावत मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यात रोहित शर्माने एक खास कामगिरी केली आहे.
रोहित शर्माने या सामन्यात ५० चेंडूत ८१ धावांची वादळी खेळी केली. या दरम्यान, त्याने १६२ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, या खेळीत त्याने ९ चौकार आणि ४ षटकार लगावले. सामन्यानंतर, रोहितच्या या विजयी खेळीचमुळे सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हा त्याचा २१ वा सामनावीर पुरस्कार ठरला आहे. या पुरस्कारासह त्याने भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली (१९ पुरस्कार) आणि महेंद्रसिंग धोनी (१८ पुरस्कार) यांना पिछाडीवर टाकले आहे.
रोहित शर्मा हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्स (२५ पुरस्कारा) आणि वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल (२२ पुरस्कार) यांचा समावेश आहे. रोहितच्या या २१ व्या पुरस्कारामुळे तो डिव्हिलियर्स आणि गेलच्या जवळ जावून पोहचला आहे.
आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माची सुरवात फारशी खास झाली नाही. तो धावा करण्यासाठी संघर्ष करत असल्याचे दिसून आला आहे. परंतु, आता त्याने जोरदार पुनरागमन करत सर्वांना सुखद धक्का दिला आहे. चालू हंगामातील १४ सामन्यांमध्ये त्याने ३१.५३ च्या सरासरीने आणि १५०.१८ च्या स्ट्राईक रेटने ४१० धावा काढल्या आहेत. ज्यामध्ये ४ अर्धशतके लागावली आहेत. रोहितने या हंगामात एकूण २२ षटकार ठोकले आहेत. ज्यामुळे त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ३०० षटकार देखील पूर्ण केले आहेत.
३० मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने गुजरातचा २० धावांनी पराभव केला. या पराभवाने गुजरात टायटन्सचे या स्पर्धेतील प्रवासाचा शेवट झाला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २२८ धावा केल्या. प्रत्युउत्तरात गुजरात टायटन्स २०८ धावा करू शकला. परिणामी मुंबईकडून २० धावांनी पराभूत व्हावे लागले.