फोटो सौजन्य - X
Viktor Axelsen divorce : ऑलम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदक जिंकणारा त्याचबरोबर जागतिक क्रमवारीमध्ये अनेक महिने पहिला क्रमांक मिळवणारा व्हिक्टर अॅक्सेलसन याने त्याच्या खेळाने जगभरामध्ये त्याची छाप पाडली आहे. व्हिक्टर अॅक्सेलसन हा डेन्मार्क देशासाठी मागील अनेक वर्ष बॅडमिंटन खेळत आहे. त्याच्या संदर्भात आता मोठी अपडेट एक समोर आले आहे. दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि माजी जागतिक क्रमांक एक वर असलेला व्हिक्टर अॅक्सेलसन चार वर्षाच्या लग्नानंतर पत्नी नटालिया कोच रोहडे तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याने सोशल मीडियावर या संदर्भात माहिती शेअर केली आहे. त्याने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, आपण ज्याप्रकारे आयुष्य प्लॅन करतो तसे नेहमीच नियोजित प्रमाणे जात नाही. नतालिया आणि मी चांगल्या अटींवर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे प्राथमिक लक्ष आमच्या दोन अद्भुत मुलींवर आणि या कठीण काळात त्यांच्यासाठी सर्वोत्तम पालक बनण्यावर असणार आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि आमच्याकडे यापुढे कोणतेही टिप्पण्या नाहीत.
Life doesn’t always go as planned. Natalia and I have decided to part ways on good terms. Our primary focus will be on our two amazing girls and being the best possible parents for them during this difficult time. We kindly ask that everyone respects our privacy and we don’t have…
— Viktor Axelsen (@ViktorAxelsen) August 19, 2025
या जोडप्याला या चार वर्षामध्ये दोन मुली आहेत. त्यांच्या पहिल्या मुलाचा जन्म ऑक्टोबर २०२० मध्ये झाला होता आणि पाच महिन्यांनंतर, २०२१ मध्ये अॅक्सेलसेन आणि रोहडे यांनी लग्न केले आणि त्यानंतर त्यांना दुसरे मुल झाले होते. लग्नानंतर हे कुटुंब त्याच वर्षी, डेन्मार्कहून दुबईला स्थलांतरित झाले होते, जिथे अॅक्सेलसन एनएएस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रशिक्षण घेत आहे. या जोडप्याने २०२२ मध्ये त्यांची दुसरी मुलगी, अया रोहडे अॅक्सेलसनचे स्वागत केले.
त्याने त्याच्या नावावर बॅडमिंटन क्षेत्रामध्ये अनेक पदक त्याचबरोबर चॅम्पियनशिप जिंकले आहेत. डब्ल्यूटीसीच्या वर्ल्ड रँकिंग मध्ये तो 183 आठवडे नंबर वन खेळाडू राहिला आहे. एवढेच नाही तर त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत 400 सिंगल सामने जिंकले आहेत. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये एकेकाळी बॅटमिंटन विश्वामध्ये राज्य केले आहे, एखादा खेळाडू जर त्याच्या विरोधामध्ये खेळत असेल तर विरोधकाला पाॅंइट घेणे कठिण होते.
‘वैभव सूर्यवंशीला जास्त ज्ञान देऊ नका…’ 14 वर्षांच्या या फलंदाजाला कोणी दिला मौल्यवान सल्ला?
अॅक्सेलसन मागिल काही महिन्यामध्ये फक्त त्याच्या वैयक्तिक जीवनाशीच नाही झुंज देत आहे तर त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये देखील अडचणी आहेत. २५ ऑगस्टपासून बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप सुरु होत आहे. दोन वेळा विश्वविजेत्या असलेल्या अॅक्सेलसनने दुखापतीमुळे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून माघार घेतली आहे. “माझ्या वैद्यकीय पथकाशी काळजीपूर्वक सल्लामसलत केल्यानंतर, मला माझ्या पुनर्वसनासाठी अधिक वेळ देण्याचा सल्ला देण्यात आला आहे,” असे एक्सेलसेनने एक्सद्वारे चाहत्यांना माहिती दिली.