फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा माजी खेळाडू अंबाती रायडू त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत पाहायला मिळतो. त्याने आयपीएल 2025 मध्ये देखील अनेक विधाने केली होती त्यामुळे त्याला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहत्यांनी ट्रोल केले होते. त्याने नुकतीच एक मुलाखत दिली आहे यामध्ये त्याने अनेक क्रिकेट खेळाडूंवर त्याचबरोबर आयपीएल 2025 च्या विजेता संघ आरसीबीवर देखील विधान केले होते. भारताचा नवा स्टार आयपीएलचा सर्वात युवा खेळाडू वैभव सुर्यवंशी याला बऱ्याचदा अनेक क्रिकेट तज्ञ सल्ले देत असतात.
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशी आयपीएल २०२५ मध्ये धमाल केल्यापासून चर्चेत आहे. त्याला राजस्थान रॉयल्सने मेगा लिलावात १.१० कोटी रुपयांना विकत घेतले. त्याने सात सामन्यांमध्ये २५२ धावा केल्या, त्याचा स्ट्राईक रेट २०६.५६ होता. त्याने आयपीएलमध्ये सर्वात तरुण पदार्पण करणारा खेळाडू होण्याचा विक्रमच केला नाही तर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही केला. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने फक्त ३५ चेंडूत शतक ठोकले.
BCCI ने दिले अजित आगरकरला दिले मोठे गिफ्ट! 2026 पर्यत करणार भारतीय संघासाठी काम
बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी असलेल्या वैभवने आयपीएलनंतर इंग्लंड दौऱ्यावर युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताच्या अंडर-१९ संघासाठी प्रभावी फलंदाजी केली. टीम इंडियाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू गेल्या पाच महिन्यांत वैभवच्या क्रिकेटमधील प्रगतीने खूप प्रभावित झाला आहे. त्याला विश्वास आहे की हा तरुण फलंदाज लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. तथापि, रायुडूने एक मौल्यवान सल्ला दिला आणि म्हटले की वैभवला जास्त ज्ञान देऊ नये.
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये रायुडू म्हणाला, “त्याच्या बॅटचा वेग असाधारण आहे. या वयात तो अद्भुत आहे. तो जो व्हीप देतो, तो कोणीही बदलणार नाही अशी आशा आहे. तो सुधारला पाहिजे. ब्रायन लारासारख्या एखाद्या दिग्गजाने कदाचित त्याच्याशी बोलायला हवे. त्याची बॅट लिफ्ट देखील अशीच होती. जेव्हा तुम्ही बचाव करत असता आणि जेव्हा तुम्ही हलक्या हाताने खेळता तेव्हा वैभव बॅटचा वेग कसा नियंत्रित करायचा हे शिकू शकतो. जर वैभवला त्याच्या खेळात हे मिळाले तर तो एक असाधारण प्रतिभा बनेल.”
आता शुभमन गिल नाही तर श्रेयस अय्यर असेल नवा कर्णधार! मोठी अपडेट आली समोर आली
माजी फलंदाज पुढे म्हणाला, “वैभवला एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे लागेल की त्याने जास्त लोकांचे ऐकू नये. फक्त त्याच्या प्रतिभेवर विश्वास ठेवावा. आणि प्रशिक्षकांनी त्याला जास्त ज्ञान देऊ नये हे देखील महत्त्वाचे आहे. ते त्याच्यावर सोडा. तो एक असाधारण प्रतिभा आहे. जर त्याला काळजीपूर्वक मार्गदर्शन केले तर ते चांगले होईल. तो राहुल भाईंच्या नेतृत्वाखाली आहे. तो भाग्यवान आहे की तो राहुल भाईंसोबत आहे. तो त्याची काळजी घेईल.” माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक आहे.