फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विजेंदर सिंह : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटच्या डिसक्वालिफिकेशनच्या प्रकरणावर काल CAS ने निर्णय दिला आहे. विनेश फोगाटच्या सिल्वर मेडलच्या मागणीला CAS ने फेटाळून लावले आहे. त्यामुळे भारतीय नागरिक काही संतापले आहेत तर काहींच्या दुःखद प्रतिक्रिया समोर येत आहेत. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला गोल्ड मेडल सामान्यामधून बाहेर करण्यात आले होते कारण ती ज्या वजनी गटामध्ये खेळणार होती त्यापेक्षा १०० ग्राम वजन जास्त झाले. यावर बरेच दिवस CAS कडे या संदर्भात केस सुरु होती. आता त्यावर निर्णय आल्यानंतर भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदर सिंहने यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
विनेश फोगाटच्या डिसक्वालिफिकेशनच्या प्रकरणावर बोलताना विजेंदर सिंह म्हणाला की, “आमच्या देशाला रौप्यपदक मिळू शकले नाही हे आमच्यासाठी खूप दुर्दैवी आहे. जर विनेश फोगट अंतिम फेरीत गेली असती तर ती भारतासाठी सुवर्णपदक मिळवून देऊ शकली असती. मी यापूर्वीही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे की, आम्ही सोबत होतो. विनेश याआधीही आणि नेहमीच तिच्या पाठीशी उभी राहीन, मला आत्ताच कळले आहे की विनेशला पदक मिळणार नाही, ही अत्यंत दु:खद बातमी आहे.
#WATCH | Delhi: On Vinesh Phogat’s application dismissed by CAS | Boxer Vijender Singh says, “This is a very sad and unfortunate thing for us…We could have won gold in the Olympics if she had made it through the finals. We are standing with Vinesh and will always support… pic.twitter.com/lU7f46gfGc
— ANI (@ANI) August 14, 2024
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) विनेश फोगटची केस फेटाळल्यानंतरही त्यांच्या पाठीशी उभी आहे. अगदी IOA ने देखील आपल्या निवेदनात युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) च्या नियमांसाठी ‘अमानवीय’ शब्द वापरला आहे. अशा नियमांमुळे खेळाडूंना कोणत्या मानसिक टप्प्यातून जावे लागते, हे समजत नाही, असेही सांगण्यात आले.