Pahalgam Terrorist Attack: India's big step, after Shahid Afridi, now Arshad Nadeem on the radar; 'This' action taken
Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे अलिकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारताला हादरा बसला आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर कडक कारवाई करत आहे. विविध क्षेत्रातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. भारत सरकारकडून आता पुन्हा एका पाकिस्तान खेळाडूवर कारवाई करण्यात आली आहे. आता भारताच्या रडारवर पॅरिस ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम आहे. त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्यासाठी मोदी सरकार दररोज नवीन योजना आखत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत, त्या योजनेचा एक भाग म्हणजे पाकिस्तानी लोकांवर डिजिटल पकड घट्ट करण्याचा प्रयत्न करता आहेत. या कारणास्तव, सरकार अशा पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट्सवर कारवाई करत आहे. ज्या पाकिस्तानी लोकांचे भारतात मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. ज्यामध्ये अर्शद नदीमचा देखील समावेश आहे.
भारतात आता अर्शद नदीमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना ‘हे अकाउंट भारतात उपलब्ध नाही’ असा संदेश मिळू लागला आहे. या संदर्भात कायदेशीर विनंती करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, “भारत, त्याच्या लष्करी आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री प्रकाशित करणे, खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने करणे आणि चुकीची माहिती पसरवणे” यासाठी भारतात अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली होती.
Pahalgam terror attack: Pakistan javelin thrower Arshad Nadeem’s Instagram account blocked in India pic.twitter.com/c7e5uxdGQU
— to be sure 😃 (@to_be_sure) May 1, 2025
बंदी घातलेल्या नावांमध्ये माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर, बासित अली आणि शाहिद आफ्रिदी यांच्या यूट्यूब चॅनेलचा समावेश करण्यात आला आहे. जे आता भारतात वापरता येणार नाहीत. तथापि, त्याचे इंस्टाग्राम अकाउंट अजून देखील उपलब्ध आहेत. तसेच, अली जफर, हानिया आमिर आणि माहिरा खान यांसारख्या पाकिस्तानी चित्रपट आणि टीव्ही उद्योगातील प्रसिद्ध व्यक्तींचे इंस्टाग्राम प्रोफाइल देखील भारतात ब्लॉक केल आहे.
माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, की सरकारच्या या कारवाईकडे सोशल मीडियावरील भारतविरोधी कंटेंटवर कडक भूमिका म्हणून पाहिले जात आहे. भारताची डिजिटल सुरक्षा आणि सामाजिक सौहार्द राखण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत आहे.