NZ vs PAK: Pakistan defeated by New Zealand in the first match
New Zealand Vs Pakistan :चॅम्पियन ट्रॉफीपासून पाकिस्तान स्वत:ला सावरू शकेलेला दिसत नाही. टी-20 मालिका गमावल्यानंतर देखील पाकिस्तानला एकदिवसीय मालिकेबाबत आशा आहेत. पण, इथे सुद्धा पराभव पाकिस्तानचा पिच्छा सोडत नाहीये. पाकिस्तानच्या संघात अनेक बदल करण्यात आला पण पराभवाचा बदळक विजयात मात्र झाला नाही. नेपियर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ७३ धावांनी धुव्वा उडवला आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचा संघात प्रवेश करून देखील पाकिस्तानला त्यांचा काही एक फायदा झाला नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : RCB vs CSK : आता धोनीला विसरा, ‘विराट रिव्ह्यू सिस्टम’ने घातला राडा..; थालाचा अंदाज फेल, पहा Video
न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 50 षटकांत 345 धावांचे भले मोठे लक्ष्य ठेवले होते. परंतु, पाकिस्तानी संघ सर्वबाद 44.1 षटकात 271 धावाच करू शकला आणि त्यांना सामना गमवावा लागला. पाकिस्तान संघाकडून बाबर आझमने सर्वाधिक 83 चेंडूंचा सामना करत 78 धावा केल्या. बाबर व्यतिरिक्त सलमान आघाने देखील ५८ धावांची खेळी केली. तर कर्णधार मोहम्मद रिझवानने 34 चेंडूत 30 धावा केल्या. पण हे खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. टी-20 मालिकेत पाकिस्तान संघाचा 1-4 असा पराभव झाला आहे. या मालिकेत बाबर आणि रिझवान खेळले नव्हते. पण आता हे दोघेही एकदिवसीय संघाचा भाग असल्याने संघाच्या परिस्थित काही एक सुधारणा झालेली दिसत नाही. त्याचा फटका संघाला बसला आहे. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने पाकिस्तानचे एकूण 4 फलंदाज बाद केले.
तत्पूर्वी, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले. न्यूझीलंडची सुरवात फारशी चांगली झाली नाही. त्यांनी अवघ्या 50 धावांत 3 विकेट गमावल्या, तेव्हा पाकिस्तानचा निर्णय योग्यच होता, असे वाटत होते. पण, त्यानंतर मार्क चॅपमन आणि डॅरिल मिशेल यांच्यातील भागीदारीने सर्वांचे अंदाज चुकवले. या दोघांमधील 199 धावांची भागीदारीम केली. त्यांच्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडची धावसंख्या 4 विकेट्स गामावत 349 धावांपर्यंत जाऊन पोहोचली.
हेही वाचा : CSK vs RCB : ‘त्या’ दोन बाऊन्सरवर दोन दिग्गजांचा संताप, खेचले षटकारानंतर षटकार, केली गोलंदाजांची धुलाई..
मिशेलसोबतच्या भागीदारीदरम्यान चॅपमनने वनडेतील आपले तिसरे शतक देखील पूर्ण केले. त्याने 94 चेंडूचा सामना करत शतक झळकावले. त्याने 111 चेंडूत 132 धावा केल्या, जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या ठरली आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. ज्यामध्ये न्यूझीलंडने नेपियरमध्ये खेळला गेलेला पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 2 एप्रिल रोजी दुसरा वनडे सामना होणार आहे.