विराट कोहली आणि एम एस धोनी(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 हंगाम चांगलाच रंगात आला आहे. अशातच 8 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले होते. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत सीएसकेसमोर 197 धावांचे आव्हान ठेवेल होते. प्रत्युत्तरात, चेन्नई सुपर किंग संघ धावांचा पाठलाग करत असताना 146 धावांपर्यंतच मजल मारू शकला. याचा परिणाम सीएसकेला सामना गमवावा लागला. मात्र या सामन्यात दोन घटना अशा घडला की दोन दिग्गजांचा संताप बघायला मिळाला.
आरसीबी संघाची फलंदाजी सुरू असताना मैदनात विराट कोहली खेळत होता. समोर मथिशा पाथिराना गोलंदाजी करत होता. विराट कोहली पाथिरानाच्या बाऊन्सरवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तेवढ्यात चेंडू बॅटला आदळल्यानंतर त्याच्या हेल्मेटच्या ग्रिलला जाऊन लागला, त्यामुळे स्टेडियममधील चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. मात्र, विराट कोहलीने थोडा वेळ घेतला आणि नंतर पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तो सज्ज झाला. पाथीरानाने पुन्हा विराटला बाऊन्सर टाकला, त्यावर विराट कोहलीने फाइन लेगच्या दिशेने खणखणीत षटकार लगावला. षटकार मारल्यानंतर विराट कोहली पाथीरानासोबत काहीतरी कुजबूज करताना दिसून आला. कोहली 30 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार लगावला आहे. त्याला नूर अहमदने माघारी धाडले.
हेही वाचा : IPL 2025 : CSK चा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी; धोनीमुळे हा दिवस आला..! सोशल मीडियावर राडा..
आयपीएल 2025 मधील 8 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवण्यात अल. या सामन्यात आरसीबीने सीएसकेचा दारुण पराभव केला. या सामन्यात आरसीबी संघाने 50 धावांच्या मोठ्या फरकाने चेन्नईचा धुव्वा उडवला. या विजयासह आरसीबीने तब्बल 17 वर्षांनंतर सीएसकेचा त्यांच्याच घरात पराभव करून दाखवला. या सामन्यात एमएस धोनीची स्फोटक खेळी बघायला मिळाली, मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. खर तर तो 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, त्यावेळी सामाना सीएसकेच्या हातातून निघून गेला होता. या दरम्यान धोनीचा सामना कृणाल पंड्याशीही झाला. त्यावेळी धोनीचा आक्रमक अंदाज बघायला मिळला.
चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील 16 व्या षटकात एम एस धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला होता. यानंतर त्याने काही छोटे मोठे फटके मारले आणि तो नाबाद राहून तंबूत परतला. यादरम्यान आरसीबीकडून कृणाल पांड्याने सामन्यातील शेवटचे षटक टाकले. तेव्हा धोनी स्ट्राइकवर होता. क्रुणालने पहिला चेंडू डॉट टाकला. यानंतर त्याने दुसरा चेंडू जवळपास बाऊन्सरच टाकला, जे बघून सर्वच अवाक झाले. धोनीही या चेंडूने हैराण झाला, कारण फिरकीपटूकडून बाऊन्सर चेंडू येणे अपेक्षित नसते.
हेही वाचा : RCB vs CSK : 17 वर्षांनंतर कोण ठरला CSK च्या पराभवाचा खलनायक? ऋतुराज गायकवाडने मांडली सारीच व्यथा..
यानंतर धोनीने देखील क्रुणाल पांड्याला चोख प्रत्युत्तर दिले. पुढच्याच चेंडूवर त्याने पांड्याला लांबलचक षटकार लगावला. धोनी यावरच थांबला नाही आणि त्याने ओव्हरचा चौथा चेंडू देखील सीमापार टोलवला आणि 2 चेंडूत 12 धावा चोपल्या. यानंतर धोनीने या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर देखील चौकार ठोकून सामन्याचा शेवट केला. या सामन्यात धोनीने 16 चेंडूत 30 धावा केल्या. मात्र त्याला संघाला विजयी करता आले नाही आणि आरसीबीने चेन्नईला पराभूत केले.