फोटो सौजन्य : X
बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान टी-20 मालिका : बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये टी-20 मालिका पार पडली. या मालिकेमध्ये पाकिस्तानच्या संघाला एकतर्फी विजय मिळवुन संघाला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. बांग्लादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर होता, यावेळी पाकिस्तानच्या संघाने एकही सामना न गमावता बांग्लादेशला पराभूत केले. पाकिस्तानच्या संघाने सलमान अली आघा याच्या नेतृत्वात संघाने कमालीचा खेळ दाखवला आहे. या मालिकेमध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्त जाणून घ्या.
गेल्या सामन्यात पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद हरिसने बांगलादेशच्या गोलंदाजांना चकवा देत शानदार शतक झळकावले. मोहम्मद हॅरिसने त्याच्या डावात ७ षटकार मारले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत ६ गडी गमावून १९६ धावा केल्या. बांगलादेशकडून फलंदाजी करताना परवेझ हुसेनने ३४ चेंडूत सर्वाधिक ६६ धावा केल्या. ज्यामध्ये ७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. याशिवाय तन्जीद हसनने ४२ धावा केल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना हसन अली आणि अब्बास आफ्रिदी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
PBKS vs MI : पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्या खचला! म्हणाला ‘मी दोषी आहे…’
पाकिस्तानच्या संघाने सुरुवातीपासुनच त्याचा दबदबा दाखवला. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने १७.२ षटकांत केवळ ३ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. ज्यामध्ये मोहम्मद हरिसने महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानकडून स्फोटक फलंदाजी करताना मोहम्मद हरिसने फक्त ४६ चेंडूत १०७ धावांची नाबाद खेळी केली. या काळात हॅरिसने ८ चौकार आणि ७ षटकार मारले आणि त्याचा स्ट्राईक रेटही २३२.६१ होता. त्याच्या शानदार खेळीमुळे मोहम्मद हरिसला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. हॅरिस व्यतिरिक्त सॅम अयुबनेही चांगली फलंदाजी केली आणि ४५ धावा केल्या.
पाकिस्तानचा हा दौरा बांगलादेशसाठी खूप वाईट ठरला आहे. या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत बांगलादेश संघाला एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तानने मालिकेत बांगलादेशला ३-० ने व्हाईटवॉश केले. पाकिस्तानच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर अब्बास अफ्ररिदी याने संघासाठी २ विकेट्स घेतले. हसन अलीच्या हाती २ विकेट लागले. फहीम अश्रफ आणि शादाब खान या दोघांना प्रत्येकी १ विकेट हाती लागला. पाकिस्तानच्या संघाने शेवटचा तिसरा सामना हा ७ विकेट्सने जिंकला, बांग्लादेशच्या संघाला निराशाजनक पराभव स्विकारावा लागला.