Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NZ vs CAN : शतक ठोकूनही कॅनडासह तीन संघ T20 World Cup 2026 मधून बाहेर! न्यूझीलंडने मारली सुपर 8 मध्ये एन्ट्री

न्यूझीलंडने कॅनडाविरुद्ध सामना जिंकला आणि यासह सुपर ८ मध्ये शानदार प्रवेश केला. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने ग्रुप डी मधून सुपर ८ साठी पात्रता मिळवली आहे. कॅनडा, अफगाणिस्तान आणि यूएई देखील स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 17, 2026 | 02:25 PM
फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा ३१ वा लीग सामना चेन्नई येथे न्यूझीलंड आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर लीग सामन्याच्या चौथ्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने सुपर 8 चे तिकीट मिळवले आहे. न्यूझीलंडने कॅनडाविरुद्ध सामना जिंकला आणि यासह सुपर ८ मध्ये शानदार प्रवेश केला. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने ग्रुप डी मधून सुपर ८ साठी पात्रता मिळवली आहे, तर कॅनडा, अफगाणिस्तान आणि यूएई देखील स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. 

न्यूझीलंडने हा सामना ८ विकेट्सने जिंकला, जो लीग टप्प्यातील ४ सामन्यांमधील किवी संघाचा तिसरा विजय होता. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, कॅनडाचा कर्णधार दिलप्रीत सिंग बाजवा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर शतक असूनही, संघ ४ विकेट्स गमावून केवळ १७३ धावा करू शकला. युवराज समराने ५८ चेंडूत शतक झळकावले. शतक ठोकूनही कॅनडाच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Super 8’s bound! 🚀 Glenn Phillips and Rachin Ravindra’s partnership of 146 (71) claimed the win in just 15.1 overs. #NZvCAN #T20WorldCup pic.twitter.com/F3ma2dLnps — BLACKCAPS (@BLACKCAPS) February 17, 2026

कर्णधार बाजवाने ३६ धावा केल्या, परंतु त्या १०० पेक्षा कमी स्ट्राईक रेटने आल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने लवकर २ विकेट्स गमावल्यानंतरही सामन्यामध्ये दमदार कमबॅक केला. ग्लेन फिलिप्सने 36 चेंडूमध्ये 76 धावा केल्या आणि रचिन रवींद्रने 39 चेंडूमध्ये 56 धावा करून संघाला मोठा विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने १६ व्या षटकातच १७४ धावांचे लक्ष्य गाठले.न्यूझीलंडने सुरुवातीलाच दोन विकेट गमावल्या, पण रचिन रवींद्रने ग्लेन फिलिप्ससोबत डाव सावरला आणि ३५ चेंडूत अर्धशतक झळकावत दमदार अर्धशतक झळकावले.

SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

गोलंदाजीमध्ये न्यूझीलंडच्या हाती चार विकेट्स लागले. गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर जेकब डफी, मॅट हेनरी, जेम्स नीशम यांनी संघाला प्रत्येकी एक विकेट मिळवून दिला. कॅनडाची गोलंदाजी फार काही प्रभावशाली राहिली नाही. न्यूझीलंडने कॅनडाचा दणदणीत पराभव केला. कॅनडासह, अफगाणिस्तान आणि यूएईसह इतर तीन संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. गेल्या वर्षी अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला होता.

Web Title: Nz vs can three teams including canada out of t20 world cup 2026 despite scoring a century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
1

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
2

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
3

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.